Aatmapamphlet Marathi Movie :   आत्मपॅम्फ्लेट (Aatmapamphlet) या मराठी चित्रपटाचं सध्या अनेक जण कौतुक करत आहेत. काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आत्मपॅम्फ्लेट चित्रपटाचं कौतुक केलं आहे. काही मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन आत्मपॅम्फ्लेट या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं तसेच या चित्रपटाच्या कथानकाचं कौतुक केलं आहे.


सुबोध भावेची पोस्ट


सुबोधनं त्याच्या कुटुंबासोबत आत्मपॅम्फ्लेट हा चित्रपट पाहिला. त्यानं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, "काल आम्ही सहकुटुंब आत्मपॅम्फ्लेट हा एक नितांत सुंदर चित्रपट पाहिला. आत्ताच्या काळात या चित्रपटाची किती गरज होती हे वारंवार बघताना जाणवत होतं. कृपया चुकवू नका आवर्जून चित्रपटगृहात जाऊन पहा! भावांनो अफाट काम आहेत तुम्ही सगळ्यांनी."






सईनं केलं कौतुक


सई ताम्हणकरनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, गेल्या काही दिवसात तुम्ही असा कोणता चित्रपट पाहिला ज्या चित्रपटाने तुमच्यावर प्रभाव टाकला? तो चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला काहीतरी बदलल्यासारखे? जसे की, जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा काय बदलले  हे तुम्ही सांगू शकत नाही पण काहीतरी बदल झालेला असतो. आज असेच काहीतरी आणि तो बदल माझ्यासोबत कायमचे राहणार आहे!! या चित्रपटाच्या टीमचे अभिनंदन,  क्षणाचाही विलंब न करता हा चित्रपट पाहा भावांनो! 




अभिनेता ललित प्रभाकरनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यानं दिग्दर्शक  आशिष बेंडे आणि आत्मपॅम्फ्लेट या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे कौतुक केलं. 






ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांनी आत्मपॅम्फलेट या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.  आत्मपॅम्फलेट हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.  परेश मोकाशी हे या  चित्रपटाचे लेखक  आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिष बेंडे यांनी केले आहे.


संबंधित बातम्या:


Aatmapamphlet Marathi Movie : चित्रपटाचं नाव ते गोष्ट; परेश मोकाशी आणि आशिष बेंडे यांनी सांगितली "आत्मपॅम्फ्लेट" सिनेमाची पडद्या मागची कहाणी!