Anurag Thakur Launches Bharat Hain Hum Series : केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांच्या हस्ते दिल्लीत 'भारत हैं हम' (Bharat Hain Hum) या अॅनिमेटेड सीरिजचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या कार्यक्रमानिमित्त प्राइम व्हिडीओ, नेटफ्लिक्स आणि दूरदर्शनवर या मालिकेचं प्रसारन होणार आहे. हिंदी सिनेसृष्टी आणि एकंदरीतच मनोरंजनसृष्टीसाठी ही सीरिज महत्त्वाची असणार आहे.


स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांवर आधारित सीरिज...


'भारत हैं हम' ही सीरिज स्वातंत्र्यलढ्यात मोलाचं योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांवर आधारित असणार आहे. दुर्लक्षित राहिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची गोष्ट या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. 15 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता दुरदर्शनवरील सर्व चॅनल्स, नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडीओवर या सीरिजचं प्रसारण होणार आहे.


'भारत हैं हम'ची घोषणा झाल्यापासून ही सीरिज चर्चेत आहे. हिंदी, इंग्रजीसह बारा भारतीय भाषांमध्ये तसेच सात आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये या सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे. मुंजाल श्रॉफ आणि तिलक शेट्टी यांनी या सीरिजची निर्मिती केली आहे.






अनुराग ठाकूर 'भारत हैं हम' या सीरिजच्या लॉन्च दरम्यान म्हणाले,"भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या पण तरीही दुर्लक्षित राहिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची गोष्ट 'भारत हैं हम' या सीरिजच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचवण्यात येईल. रानी अब्बक्कासारख्या व्यक्तींची जगाला ओळख व्हावी हा या सीरिजमागचा उद्देश आहे. या सीरिजच्या माध्यमातून भारताची संस्कृती, इतिहास, जीवन अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला जाईल. या सीरिजमध्ये 30% महिला आहे. यावरुनच स्वातंत्र्यलढ्यात महिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं दिसून येतं. 






अनुराग ठाकूर पुढे म्हणाले,"भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत प्रगती करत आहे. आता गौरवशाली इतिहासासह भविष्याकडे वाटलाच करायची आहे. छोट्या पडद्यासह ओटीटीवर एकाचवेळी प्रसारित होणारी ही पहिलीच सीरिज आहे". 



संबंधित बातम्या


R Madhavan New President FTII : अभिनेता आर.माधवनची FTII च्या अध्यक्षपदी नियुक्ती; अनुराग ठाकुर यांनी ट्विट करत दिली माहिती