Dharmaraobaba Atram Movie : आणखी एका राजकीय नेत्याचा जीवनपट रुपेरी पडद्यावर; डॉक्युड्रामा चित्रपटाचा ट्रेलर लाँच
Dharmaraobaba Atram : महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
Dharmaraobaba Atram Movie : महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmaraobaba Atram) यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. आत्राम यांचा राजकीय-सामाजिकपट उलगडणाऱ्या 'धर्मरावबाबा आत्राम - दिलों का राजा' या डॉक्युड्रामाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. एबिना एंटरटेनमेंटच्या बॅनर अंतर्गत निर्मित झाला आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्या हस्ते चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन भुषण अरुण चौधरी यांनी केली असून नीतू जोशी यांनी निर्मिती केली आहे. चित्रपटात धर्मरावबाबा आत्राम यांच्या तरुण वयातील व्यक्तिरेखा अभिनेता जितेश मोरे याने साकारली आहे.
यावेळी प्रफुल पटेल यांनी म्हटले की,"मला माहित नव्हतं की बाबा अभिनय करू शकतात. ह्या चित्रपटाच्या माध्यमातून आमच्या देशाचं आणि ह्या राज्याचा हिरा लोकांपर्यंत पोहचणार आहे. बाबा हेअहेरीचे राजा आहेत. अहेरी हा एक आदिवासी भाह असून ते त्यांच्या राजघराणे कुटुंबातून आहेत. त्यांच वय अगदी 14 वर्ष असतांना त्यांच्या वडिलांचा मृत्यु झाला. त्यानंतर खरा खडतर प्रवास सुरू झाला. धर्मरावा आत्राम यांना हे यश गाठण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. त्यांच्या आयुष्यातील विविध घटना या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. मी ट्रेलर पाहून आनंदित असल्याचे प्रफुल पटेल यांनी सांगितले.
निर्माती नीतू जोशी यांनी सांगितले की,"हा चित्रपट तयार होण्याच्या काळात, मी धर्मरावबाबांना जवळून ओळखलं, त्यांच्या संघर्षांना समजता आलं, त्यांच्या समाजातील दायित्वाचं आणि योगदान अनुभवलं. या चित्रपटातून नव्या पिढीला चांगला संदेश देणे आणि त्यांना जीवनात उल्लेखनीय कामगिरी करण्यास प्रेरणा मिळेल असा विश्वास नीतू जोशी यांनी व्यक्त केला. मी नक्षलग्रस्त भागात गेले. धर्मरावबाबा आत्राम यांचा संघर्ष आणि त्यांनी केलेल्या कामाची माहिती ऐकून मी हा चित्रपट बनवण्यासाठी निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
View this post on Instagram
मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, "मला नवीन जीवन मिळालं. नक्षलवाद्यांच्या छापांपासून बाहेर पडलो, नदी नाल्यातून पाणी प्यायचो, जंगलाबाहेर निघणार नाही असे वाटत होते. ह्या सर्व प्रवासाचं आणि संघर्षाची घटना चित्रपटातून दाखवले असल्याचे त्यांनी सांगितले.
दिग्दर्शक भुषण अरुण चौधरी म्हणाले, "आजही या वयात आत्राम प्रचंड उत्साही आहेत. चित्रपटात जितेश मोरे यांनी तरुण बाबांचा पात्र केलंय जितेश हा अतिशय अभ्यासु अभिनेता आहे त्यानी बाबांच आयुष्य खुप सुंदर रेखाटले असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
अभिनेता जितेश मोरेने सांगितले की,"मला हे पात्र साकारायला मिळणं हे खरं तर माझ्यासाठी भाग्यचं म्हणाव लागेल. खूप संभाळून आणि अभ्यास करूनच व्यक्तिरेखा साकारली. मला शुटींग दरम्यान अनेक लोकांनी बाबा आत्राम यांच्या तरुणपणातील संदर्भ दिला. ही व्यक्तीरेखा साकारणे आव्हानात्मक होती असेही त्याने सांगितले.