Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) अडचणी वाढणार आहेत.  ईडीने समन्स बजावल्यानंतर आज जॅकलीन दिल्लीतील ED कार्यालयात हजर झाली. तिथं तिची चौकशी करण्यात आली. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिनचे नाव समोर आले आहे. सुकेशकडून महागडी जनावरं गिफ्ट घेणं महागात पडले आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिनचे नाव समोर आले आहे. मुंबई विमानतळावर ईडीने तिला थांबवले होते. त्यानंतर आता 8 डिसेंबर रोजी दिल्लीत हजर राहण्याचे ईडीने तिला समन्स बजावले होते. 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी झाली असल्याची माहिती आहे. 







सुकेशने जॅकलीनला दिली कोटींची भेट

जॅकलीन एका कार्यक्रमासाठी दुबईला जात असताना ईडीच्या अधिकाऱ्यांनी 5 तारखेला मुंबई विमानतळावर तिला थांबवले होते. सुकेश चंद्रशेखर (Sukesh ChandraShekhar) यांच्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची ईडीकडून चौकशी सुरु आहे. सुकेश चंद्रशेखर या उद्योगपतीने एकूण 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचं समोर आलं होतं. तल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश आहे. जॅकलीन आणि सुकेशचा एक फोटोदेखील समोर आला आहे. हा फोटो समोर आल्यानंतर जॅकलीन आणि सुकेश रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा करण्यात आला होता. दिल्लीच्या तिहार तुरुंगातून 200 कोटी रुपये वसूल केल्याप्रकरणी ईडीने शनिवारीच आरोपपत्र दाखल केले होते.





जॅकलीनला घोडा आणि मांजर गिफ्ट करणारा सुकेश चंद्रशेखर कोण ?
सुकेश चंद्रशेखर हा बंगळुरुतला एक उद्योगपती आहे. सुरुवातीला नोकरी देण्याच्या आमिषाने त्याने अनेकांची फसवणूक केली. 75 जणांचे 100 कोटी रुपये घेऊन त्याने पोबारा केला. निवडणूक आयोगात ओळख असल्याचं सांगून हवं ते चिन्ह मिळवून देण्याचं आमिष त्यानं दाखवलं. याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी त्याला 2017 मध्ये अटक केली.


संबंधित बातम्या


Jacqueline Fernandez : जॅकलीनच्या अडचणीत वाढ, ईडीने मुंबई विमानतळावर रोखलं


52 लाखांचा घोडा, 36 लाखांच्या मांजरींचं गिफ्ट! जॅकलिनला महागात पडणार; गिफ्ट देणारा सुकेश कोण?


Money Laundering Case : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अभिनेत्री Jacqueline Fernandez ईडीसमोर हजर, नोंदवला जबाब



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha