Manisha Slapped Sachinder Sharma: प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक (Bollywood Director) सचिंद्र शर्मा (Sachinder Sharma) यांच्या 'मुंबई कॅन डान्स साला'या चित्रपटाचा ग्रँड म्युझिक लॉन्च सोहळा पार पडला. भर सोहळ्यात अभिनेत्रीनं मंचावर जाऊन दिग्दर्शक सचिंद्र शर्मा यांना मारहाण केली. तसेच, दिग्दर्शक संचिंद्र शर्मा यांच्याविरोधात मारहाण आणि विनयभंगाची तक्रारही दाखल केली. अभिनेत्रीनं दिग्दर्शक सचिंद्र शर्मा यांच्यावर कास्टिंग काऊचचा आरोप केला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तपास केला आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जिस्म चित्रपटाच्या म्युझिक लाँचवेळी बॉलिवूड अभिनेत्री मनीषानं चित्रपट दिग्दर्शक सचिंद्र शर्मा यांच्या कानशिलात मारली आणि त्यांच्यावर कास्टिंग काउचचा आरोप केला. तिनं असंही सांगितलं की, डायरेक्टरची माझ्यावर वाईट नजर होती आणि त्यानं मला दोन-तीन वेळा तडजोड करण्यासही सांगितलं होतं.
अभिनेत्री मनिषानं असंही सांगितलं की, "त्यानं मला स्पष्टपणे सांगितलं की, जर तू माझ्यासोबत थोडं कॉम्प्रोमाइज केलं असतंस, माझ्यासोबत झोपली असतीस, तर आज तू राखी सावंतच्या जागी असतीस. त्यानं अनेकवेळा माझा हात धरण्याचा प्रयत्नही केला. मला मारण्याचा प्रयत्न केला. पाहा, सगळं काही रेकॉर्ड केलं आहे."
दरम्यान, आश्चर्याची बाब म्हणजे, या फिल्ममध्ये बॉलिवूडची ड्रामा क्विन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखी सावंतनं या चित्रपटात एकच आयटम नंबर केला होता. याविषयी बोलताना राखी सावंत म्हणाली होती की, जेव्हा मी स्टेजवर होते, त्यावेळी मनिषाला खूप राग आला आणि तिच्यासोबत काय झालं ते मलाही माहीत आहे. तिनं मला आधीच कास्टिंग काऊचबाबत सर्व काही सांगितलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :