Karisma Kapoor On Her And Kareena Kapoor Nick Name: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) करिश्मा कपूर (Karishma Kapoor) गेल्या आठवड्याच इंडियन आयडॉल 15 (Indian Idol 15) मध्ये दिसली होती. खरं तर सिंगिंग रिॲलिटी शोनं (Reality Television Show) राज कपूर (Raj Kapoor) यांची 100 वी जयंती साजरी केली होती. यानिमित्तानं करिश्मा कपूर उपस्थित राहिली होती. त्यावेळी करिश्मानं कपूर कुटुंबाबाबत अनेक रंजक खुलासे केले. करिश्मा कपूरनं शोमध्ये तिच्या लोलो टोपणनावामागील गमतीशीर किस्सा सांगितला. तसेच, तिनं करिनाचं टोपण नाव बेबो कसं पडलं? याबाबतही खुलासा केला आहे.
करिश्मा कपूरचं 'लोलो' हे टोपणनाव कसं पडलं?
करिश्मा कपूरनं खुलासा केला की, "एक विदेशी अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा आहे. तिच्याच नावातून लोलो घेतलं आणि माझी आई सिंधी आहे, आमच्याकडे रोटीचा प्रकार बनवला जातो, त्याला 'गोड लोली' म्हटलं जातं. म्हणून आम्ही तिला लोलो देखील म्हणतो. तिथून लोलो, तिथून आणि तिथून... सगळीकडून , मग पप्पांनी त्यांच्या बाजूनं लोलो नाव ठेवलं."
करीना कपूरचं 'बेबो' हे टोपणनाव कसं पडलं?
याशिवाय करीना कपूरच्या बेबो टोपणनावाबद्दल बोलताना करिश्मा कपूरनं खुलासा केला की, "जेव्हा बेबो आली, तेव्हा सगळ्यांना वाटलं की, आता तिचंही काहीतरी मजेशीर, गोंडस नाव असावं, हा डब्बू, चिंटू, चिंपू, लोलो, वडिलांनी तर ही नावं ठेवलेली मग करिनाचं टोपणनाव बेबो ठेवलं गेलं."
राज कपूर यांचंही होतं निकनेम...
यावेळी, करिश्मा कपूरनं बोलताना असंही सांगितलं की, दिग्गज अभिनेते राज कपूर यांचं देखील एक टोपणनाव होतं, ज्याबद्दल कोणालाही माहिती नव्हतं. ती म्हणाली, "आजपर्यंत नॅशनल टेलिव्हिजनवर कुणालाही माहीत नाही की, आजोबांचंही एक टोपणनाव होतं. अनेकजण त्यांना राजी म्हणायचे, कारण तुम्हाला माहीत आहे की, ते राज कुमारासारखे दिसायचे, गोरेपान... निळेशार डोळे..."
राज कपूर यांच्या 100 व्या जयंतीच्या कार्यक्रमाला संपूर्ण बॉलिवूड उपस्थित
नुकतीच कपूर कुटुंबानं राज कपूर यांची 100 वी जयंती साजरी केली. या सेलिब्रेशनमध्ये करीना कपूर, सैफ अली खान, करिश्मा कपूर, रणधीर कपूर, बबिता, रणबीर कपूर, आलिया भट्ट, नीतू कपूर यांच्यासह संपूर्ण कपूर कुटुंब उपस्थित होतं. राज कपूर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही सहभाग घेतला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :