Vikrant Massey On His Retirement: बॉलिवूडच्या (Bollywood Actor) गुणी अभिनेत्यांमध्ये आवर्जुन समाविष्ट केलं जाणारं एक नाव म्हणजे, विक्रांत मेस्सी (Vikrant Massey). या अभिनेत्यानं फार कमी काळात प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली. जवळपास 21 वर्षांच्या कारकिर्दीत विक्रांतनं यशाचं सर्वोच्च शिखर गाठलं. यामध्ये त्याच्या '12th Fail' या चित्रपटाचा मोठा वाटा आहे. टेलिव्हिजनवरील मालिकांमधून सुरुवात केलेल्या विक्रांतनं आजवर कधी मागे वळून पाहिलंच नाही. टेलिव्हिजन, त्यानंतर चित्रपट आणि आता ओटीटीवरही विक्रांतनं आपली छाप सोडली. फार कमी वेळात विक्रांतनं चाहत्यांना आपलंस केलं. पण, अशातच वर्षाच्या शेवटच्या महिन्यात विक्रांत मेस्सीनं सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि अवघी इंडस्ट्री हादरली. विक्रांतनं आपल्या पोस्टमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. विक्रांतच्या निर्णयानं सारेच हादरून गेले आणि त्याच्या निर्णयाचे अनेक तर्क-वितर्क लावू लागले. पण, अशातच आता विक्रांतनं आपल्या पोस्टबाबत मौन सोडलं. 


टाईम्स नेटवर्क इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना विक्रांत मेस्सी म्हणाला की, "मी त्या पोस्टमध्ये बरंच इंग्रजी लिहिलेलं आणि अनेकांचा गैरसमज झाला. म्हणूनच मी क्लिअरिफिकेशन जारी केलं आहे. मी रिटायर होत नाही. मी स्वतःला आणखी उत्तम बनवण्यासाठी खूप आवश्यक ब्रेक घेत आहे."


"मध्यरात्री पोस्ट केली, माझ्या डोळ्याला डोळा लागत नव्हता..."


37 वर्षीय विक्रांतनं सांगितलं की, पत्नी शीतल ठाकूर सोबत सल्लामसलत केल्यानंतरच मी एवढा मोठा निर्णय घेतला आहे. त्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, गेली काही वर्षे खरोखरच छान गेली आहेत. मी गेल्या वर्षांसाठी सर्वांचा आभारी आहे. मी जे मागितलं होतं, त्यापेक्षा खूप जास्त मिळालं. एक अभिनेता म्हणून मी गेली 21 वर्ष प्रोफेशनली काम करत आहे, पण '12th Fail' नंतर खूप छान वाटलं. फक्त संदर्भात गोष्टी मांडण्यासाठी, मी ती पोस्ट मध्यरात्री केली, कारण मला झोप येत नव्हती.


दिग्दर्शन, निर्मितीमध्ये तुमचा हात आजमावायचा...


विक्रांत मेस्सीनं सांगितलं की, त्याला दिग्दर्शन आणि निर्मितीमध्ये हात आजमावायचा आहे, परंतु सध्या तो याबद्दल बोलण्यास तयार नाही. ते म्हणाले, "सध्या मला माझ्या मुलाला (वरदान) मोठं होताना पाहायचंय, अजून लिहायचंय आणि माझ्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. मी बऱ्याच वर्षांपासून 4-5 तासांपेक्षा जास्त झोपलो नाही आणि मला हे सुधारण्याची गरज आहे."






दरम्यान, विक्रांत मेस्सीनं 2 डिसेंबर रोजी एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामुळे चाहत्यांना धक्का बसला होता. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं होतं की, त्याला कामातून ब्रेक घ्यायचा होता, पण लोकांना असं वाटलं की, मी रिटायरमेंट घेतोय.


'या' चित्रपटांत दिसलेला विक्रांत मेस्सी 


विक्रांत मेस्सी 'द साबरमती रिपोर्ट'मध्ये दिसून आला होता. आता तो 'यार जिगरी', 'TME'और 'आंखों की गुस्ताखियां' मध्ये शनाया कपूरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटाची शुटिंग सध्या सुरू आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


करिनाला म्हणतात, 'बेबो'... तर करिश्माचं लाडाचं नाव 'लोलो'; कुणी ठेवलं? यामागे आहे एक मजेशीर किस्सा...