Rekha Manisha Koirala :  संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या 'हिरामंडी: द डायमंड बाजार' (Heeramandi) या वेब सीरिजची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून काही कलाकारांनी कमबॅक केले आहे. हिरामंडी या वेबसीरिजमध्ये कलाकारांचा समावेश आहे.  या 'हिरामंडी' वेब सीरीजमधील भूमिकेसाठी अभिनयासाठी मनीषा कोईरालाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ही वेब सीरिज सध्या नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे. 


आठ एपिसोड असलेल्या या वेब सीरिजमध्ये मनिषा कोईरालाने मल्लिका जान  ही व्यक्तीरेखा साकारली आहे. पहिल्यांदा ही भूमिका रेखाला देण्यात आली होती, असे मनिषा कोईरालाने सांगितले. 



'फिल्मीज्ञान'ला दिलेल्या मुलाखतीत, मनिषा  कोईरालाला रेखाला ऑफर केलेल्या रोलबद्दल विचारले. त्यावर मनिषा कोईरालाने सांगितले की, रेखा यांना ही व्यक्तीरेखा 18-20 वर्षांपूर्वीच ऑफर झाली होती. संजय लीला भन्साळीची हिरामंडी ही वेब सीरिज पाहिल्यानंतर रेखाने आपल्याशी स्वत: हून फोन केला असल्याचे सांगितले. आपल्यासारखी कोणीतरी ही भूमिका साकारावी असेच वाटत होते. ही अपेक्षा पूर्ण झाल्याचा आनंद वाटत असल्याचे रेखाने म्हटले असल्याचे मनिषा कोईरालाला वाटले.  







रेखा म्हणजे देवीच...






रेखासारख्या दिग्गज कलाकाराचे आशीर्वाद मिळणे हे माझ्यासाठी  खूप मोठे असल्याचे मनिषाने सांगितले. रेखा यांची प्रतिक्रिया ऐकून मी भावूक झाली आणि त्यांचे त्यांचे आभारही मानले असल्याचे रेखाने म्हटले. मनिषाने रेखाला देवी संबोधले आणि त्यांच्या कामाची आणि सौंदर्याची प्रशंसा केली.



'हिरामंडी' चित्रपटातील कलाकार


या मालिकेत मनीषा कोईराला व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, संजीदा शेख, शर्मीन सहगल, ताहा शाह, फरीदा जलाल, शेखर सुमन, फरीदा खान, अध्यायन सुमन यांच्यासह इतर कलाकार दिसणार आहेत. काहींना लाहोरच्या हिरामंडीभोवतीची तिची कथा आवडली आहे. तर काहींनी त्याच्यातील उणीवांवर बोट ठेवले आहे.