Bollywood Actress Last Wish : भारतीय मनोरंजनसृष्टीतील अनेक अभिनेत्रींनी (Actress) आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. 60-70 च्या दशकात अनेक क्लासिक चित्रपटांची निर्मिती झाली आहे. आजही बॉलिवूडमध्ये अनेक प्रयोग होताना दिसून येतात. त्याकाळी बंगाली चित्रपटांचाही चांगलाच बोलबाला होता. अनेक बंगाली अभिनेत्रींना आपल्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अशाच एका अभिनेत्रीच्या शानदार कामाचे दिलीप कुमारदेखील मोठे चाहते झाले होते. पण काही वर्षांनी अभिनेत्रीने एका खोलीत स्वत:ला बंद केलं. तसेच अभिनेत्रीने शेवटची इच्छादेखील ठेवली होती.
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचं नाव सुचित्रा सेन (Suchitra Sen) असं आहे. सुचित्राने लग्नानंतर अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. वयाच्या 15 व्या वर्षी सुचित्राचं लग्न झालं होतं. त्यानंतर पती आणि सासऱ्यांच्या मदतीने तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं.
उत्तम कुमारसोबत सुचित्राची जोडी गाजली
सुचित्रा सेनने 1952 मध्ये बंगाली चित्रपटाच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली. पहिल्याच चित्रपटात ती गायिकादेखील होती. पण सुचित्राचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला. पण सुकुमार दासगुप्ता यांनी सुचित्राला नोटिस केलं आणि 'सात नंबर कोयदी' या चित्रपटासाठी तिची निवड केली. या चित्रपटानंतर तिची गाडी सुसाट सुटली. सुचित्रा आणि उत्तम कुमार यांची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली. उत्तम कुमार आणि सुचित्रा यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं आहे.
पतीने सोडलेलं...
सुचित्रा सेनचा 'प्रनय पाशा' हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. एक चित्रपट फ्लॉप झाल्याने सुचित्राला खूप वाईट वाटत होतं. तिने सिनेसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पतीसोबत तिचे वाद सुरू झाले. वाद, भांडण ऐवढं वाढलं की ते लेकीला घेऊन कायमचे न्यूयॉर्कला गेले.
36 वर्षे अभिनेत्रीने स्वत:ला खोलीत कैद ठेवलं
अभिनयक्षेत्राला रामराम करत सुचित्रा रामकृष्ण आश्रमात गेली. एका खोलीत ती राहू लागली. याच खोलीत तिने स्वत:ला कैद ठेवलं. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्रीने या खोलीत स्वत:ला 36 वर्षे कैद ठेवलं होतं.
'ही' होती अभिनेत्रीची शेवटची इच्छा
सुचित्राची शेवटची इच्छा खूप वेगळी होती. निधनानंतर आपला चेहरा कोणी पाहू नये, असं अभिनेत्रीला वाटत होतं. सुचित्राचं 2014 मध्ये निधन झालं. अभिनेत्रीच्या अंतिम संस्काराला हजारो लोक आले होते. पण अभिनेत्रीचा चेहरा झाकण्यात आला होता. निधनाच्या पाच तासांनंतर सुचित्राचे अंतिम संस्कार करण्यात आले होते.
संबंधित बातम्या