Bollywood Actress : बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक अभिनेत्री  आज इंडस्ट्रीपासून दूर आहेत. काही चित्रपट केल्यानंतर या अभिनेत्रींनी इंडस्ट्रीला अलविदा केलं आहे. त्यानंतर काहींनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. तर काही अभिनेत्री दुसऱ्या क्षेत्रात करिअर करत आहेत. बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीने (Bollywood Actress) तर पहिला चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर लगेचच बॉलिवूडला रामराम केला. आजच्या घडीला अभिनेत्री व्लॉगिंग करते. आज ती एक लोकप्रिय इंफ्लुएंअर आहे. मेकअप आणि स्किनकेअरमध्येही ती एक्सपर्ट आहे. 


'मेरी प्यारी बिंदु' (Meri Pyaari Bindu) हा चित्रपट 2017 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्रीने मालविका सितलानीने (Malvika Sitlani) अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला. पहिला चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर मालविकाने इंडस्ट्री सोडली आणि व्लॉगिंग करायला सुरुवात केली.


तीन वर्षांत संसार मोडला...


मालविका 2020 मध्ये बॉयफ्रेंड अखिल आर्यनसोबत (Akhil Aaryan) लग्नबंधनात अडकली. आईओएन एनर्जीचे ते सह-संस्थापक आहेत. 2020 मध्ये लग्न केल्यानंतर या जोडप्याने 2023 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मालविका आणि अखिलचा घटस्फोट झाला तेव्हा ती प्रेग्नंट होती. मालविकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना अखिलपासून विभक्त होत असल्याची माहिती दिली होती. 






पोस्टमध्ये विभक्त होणार असल्याचं लिहिलं असलं तरी त्यांनी होणाऱ्या बाळाचा सांभाळ एकत्र करण्याचा निर्णय घेतला होता. बाळाची जबाबदारी दोघांनी घेतली होती. मालविकाने मागिल वर्षात मे महिन्यात मुलीला जन्म दिला. मालविकाने आपल्या लेकीचं नाव अभिगेल ठेवलं होतं. मालविका आपल्या लेकीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यांचे फोटो चांगलेच व्हायरल होतात. 


मालविका काय करते? 


मालविकाने अभिनयक्षेत्राला अलविदा केलं आहे. आता पूर्णपणे ती व्लॉगिंग करते. मालविका स्वत:चं ब्युटी ब्रँड चालवते. या ब्युटी ब्रँडचं नाव मेसिक ब्युटी असं आहे. मालविकाने पार्टनरशिपमध्ये 2020 मध्ये या ब्रँडची सुरुवात केली आहे. मालविकाचे व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. तसेच तिने पुन्हा इंडस्ट्रीत यावं, अशी चाहत्यांची इच्छा आहे.


संबंधित बातम्या


Bigg Boss Marathi 5 : लयभारी! 'बिग बॉस मराठी'बाबत मोठी अपडेट समोर; महेश मांजरेकर नव्हे तर रितेश देशमुख करणार होस्टिंग