Goodbye 2021 : 2021 ची सुरुवात भारतीय सिनेसृष्टीसाठी चांगली होती. दक्षिण भारतीय चित्रपटांच्या चाहतावर्गातदेखील वाढ होत आहे. लॉकडाऊन दरम्यान दक्षिण भारतीय चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पाहिले गेले. येत्या वर्षात 'जय भीम', 'पुष्पा' सारख्या अनेक सिनेमांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे.   


Drishyam 2 : 'दृश्यम 2' हा सुपरहिट मल्याळम चित्रपट 19 फेब्रुवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाचे दिग्दर्शन जीतू जोसेफ यांनी केले आहे. सिनेमात मोहनलाल व्यतिरिक्त मीना, सिद्दीकी, आशा शरत, मुरली गोपी, अनसिबा,साईकुमार यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. 


Jai Bhim : 'जय भीम' या चित्रपटामध्ये  दाक्षिणात्य अभिनेता सूर्याने (Suriya) प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच  या चित्रपटात प्रकाश राज, मनिकंदन, गुरू सोमसुंदरम, अभिनेत्री लिजो मोल जोस, राजिशा विजयन या कलाकारांनी महत्तवपूर्ण भूमिका साकारली आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला होता. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला आणि चित्रपटाच्या कथेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.



Pushpa: The Rise :  प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) हा चित्रपट 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉलिवूड बॉक्स ऑफिसवरदेखील धमाका केला आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबतच फहाद फासिलने देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन  देवी श्री प्रसाद यांनी केले आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. 


Love Story : लव्ह स्टोरी' सिनेमात नागा चैतन्य आणि सई पल्लवी मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शेखर कममुला यांनी केले आहे.


The Great Indian Kitchen : 'द ग्रेट इंडियन किचन' सिनेमात निमिषा सजयन आणि सूरज वेंजारामूडू मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा एका नवविवाहित महिलेवर भाष्य करतो. या सिनेमाला अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत. 


संबंधित बातम्या


Samantha Ruth And Naga Spotted Together : घटस्फोटाच्या निर्णयानंतर समंथा आणि नागा चैतन्य आमने-सामने


Bigg Boss Marathi 3 : प्रेक्षकांचे कौतुक, फटाक्यांची आतषबाजी विशाल निकमच्या घराबाहेर चाहत्यांचा जल्लोष


Year Ender 2021 : आर्यन खान, राज कुंद्राची अटक ते कंगना रनौतच्या ट्विटरवर बंदी... जाणून घ्या बॉलिवूडमध्ये काय घडलं या वर्षभरात


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha