Bollywood 5 Richest Couples : बॉलिवूडमधील  सेलिब्रिटींच्या संपत्तीबाबत जाणून घेण्यासाठी त्यांच्या चाहते उत्सुक असतात. बॉलिवूडमधील टॉप-5 श्रीमंत कपल्स कोणते ते जाणून घेऊयात...
   
शाहरूख खान आणि गौरी खान (shahrukh khan and gauri khan)
बॉलिवूडचा बादशाहा शाहरूख खान आणि गौरी खान यांची जोडी चर्चेत असते. बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत जोड्यांच्या यादीत सर्वात पहिले नाव शाहरूख खान आणि गौरी खान यांचे येते.  रिपोर्टनुसार, शाहरूख आणि गौरी यांच्याकडे 965 मिलियन डॉलर एवढी संपत्ती आहे. शाहरूख आणि गौरीच्या मन्नत या बंगल्याची किंमत जवळपास 200 कोटी रूपये आहे. हा बंगला 6 मजल्यांचा असून सी फेसिंग आहे. त्यांचा दुबईमध्ये देखील एक व्हिला आहे. या व्हिल्याची किंमत 24 कोटी आहे. शाहरूखचे लंडन पार्क लेनमध्ये 172 कोटीचे घर आहे.


राणी मुखर्जी आणि आदित्य चोपडा (Rani Mukerji and Aditya Chopra)
बॉलिवूडमधील दुसरी श्रीमंत जोडी म्हणजे राणी मुखर्जी आणि आदित्य चोपडा. त्यांची एकूण संपत्ती 900 मिलियन डॉलर्स आहे. 


सोनम कपूर आणि आनंद आहूजा (Sonam Kapoor,Anand Ahuja )
प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहूजा यांचे श्रीमंत कपल्सच्या यादीत तिसरे नाव येते. त्याची एकूण संपत्ती 662 मिलियन डॉलर आहे. 


अमिताभ बच्चन आणि जया बच्चन (jaya bachchan and amitabh bachchan)
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांची एकूण संपत्ती 410 मिलियन डॉलर एवढी आहे.


ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार(Twinkle Khanna and Rani Mukerji)
बॉलिवूडमधील खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांच्याकडे 280 मिलियन डॉलर एवढी संपत्ती आहे. 


संबंधित बातम्या


Goodbye 2021 : Drishyam 2 पासून Jai Bhim पर्यंत.... हे वर्ष संपण्याआधी हे सर्वोत्तम सिनेमे पाहायलाच हवेत


Samantha Ruth And Naga Spotted Together : घटस्फोटाच्या निर्णयानंतर समंथा आणि नागा चैतन्य आमने-सामने


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha