एक्स्प्लोर

अर्जुन कपूरसोबत आईच्या नात्यावर मलायका अरोराच्या मुलाला काय वाटतं?

अर्जुन कपूरसोबत नव्या नात्याला सुरुवात करण्याविषयी मलायका अरोराने 16 वर्षांचा मुलगा अरहानजवळ विषय काढला, तेव्हा त्याची प्रतिक्रिया ऐकून तिच्याही डोळ्यात पाणी आलं.

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यातील प्रेमसंबंध आता झाकल्या मुठीप्रमाणे राहिलेले नाहीत. दोघांनीही याबाबत उघडपणे वाच्यता करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच मलायकाच्या 16 वर्षांच्या मुलाने आईच्या नव्या नात्याबद्दल दाखवलेला समंजसपणा चर्चेचा विषय ठरला आहे. 43 वर्षांची मलायका आणि 34 वर्षांचा अर्जुन. मलायका घटस्फोटित आणि वयाने मोठी, शिवाय किशोरवयीन मुलाची आई. त्यामुळे वयाने नऊ वर्षांनी लहान, अविवाहित तरुणासोबतचे तिचे प्रेमसंबंध चर्चेचा विषय ठरले नसते, तरच नवल. त्यातच बॉलिवूडमध्ये एका भिंतीला शेकडो कान असतात. एकीकडे नेटिझन्स दोघांना यथेच्छ ट्रोल करत असताना तिच्या कुटुंबातून मात्र तिला चांगला पाठिंबा मिळताना दिसत आहे. अर्जुनसोबत नव्या नात्याला सुरुवात करण्याविषयी मलायकाने 16 वर्षांच्या अरहानजवळ विषय काढला, तेव्हा त्याची प्रतिक्रिया ऐकून तिच्याही डोळ्यात पाणी आलं. आपला लेक आपल्या नव्या नात्याचा स्वीकार करण्याबाबत किती समजूतदारपणा दाखवत आहे. म्हणजेच आपण मुलावर योग्य संस्कार केले, असे भाव तिच्या मनात तरळले. अरहानची प्रतिक्रिया काय होती, या प्रश्नावर मलायकाने उत्तर दिलं. 'कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रामाणिक राहायला हवं, असं मला वाटतं. तुमच्या आयुष्यात काय सुरु आहे, हे निकटवर्तीयांना सांगणं आवश्यक आहे. या गोष्टी समजून घेण्यासाठी त्यांना वेळ द्यायला हवा. आमचं याविषयी बोलणं झालं आणि सगळे आधीपेक्षा जास्त आनंदी आहेत' असं मलायका म्हणाली. 'तुम्ही रिलेशनशीपमध्ये असताना वय आड येत नाही. हे दोन हृदयं आणि डोक्यांचं कनेक्शन असतं. दुर्दैवाने आपण अशा समाजात राहतो, जे वेळेसोबत पुढे जाण्यास तयार नाहीत. सगळीकडे आपल्यापेक्षा वयाने मोठ्या पुरुषावर प्रेम करणाऱ्या महिला दिसतात. मात्र एखादी महिला वयाने लहान पुरुषावर प्रेम करते, तेव्हा तिला हताश आणि म्हातारी म्हटलं जातं' असंही मलायका म्हणाली. अर्जुन कपूरसोबत कधी विवाहबंधनात अडकणार, या प्रश्नाचं उत्तर देण्यास मात्र मलायकाने टाळलं.

महत्त्वाच्या बातम्या

Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
Trisha Krishnan with Vijays Parents: विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
Awarapan 3: 'आशा आहे की 'आवारापन'चा तिसरा पार्ट...'; इम्रान हाश्मीचा प्रेक्षकांना सरप्राइज, सिनेमाचा तिसरा पार्ट येणार?
'आशा आहे की 'आवारापन'चा तिसरा पार्ट...'; इम्रान हाश्मीचा प्रेक्षकांना सरप्राइज, सिनेमाचा तिसरा पार्ट येणार?

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
Embed widget