Malaika Arora and Kareena Kapoor Viral Photo : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मलायकाचे वडील अनिल मेहता यांचं निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वी मलायकाच्या वडिलांनी त्यांच्या मुंबईत घराच्या बाल्कनीतून उडी मारुन आत्महत्या केली. यानंतर मलायका अरोरा फार कठीण परिस्थितीतून जात आहे. अशातच तिचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर मलायका अरोरा आणि अमृता यांचा करीना आणि करिश्मा कपूरसोबतचा पार्टी करतानाचा फोटो व्हायरल होत आहे.


वडिलांच्या निधनानंतर मलायकाची करीना-करिश्मासोबत पार्टी?


अभिनेत्री मलायका अरोराचे (Malaika Arora) वडील अनित मेहता  (Anil Mehta) यांनी 11 सप्टेंबर रोजी मुंबईतील घरात आत्महत्या केली. यानंतर त्यांच्या कुटुंबियांवर (Malaika Arora Father Death) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यानंतर आता वडिलांच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसांनंतर मलायकाचा पार्टी करतानाचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये मलायका तिची बहिण अमृता, करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांच्यासोबत पार्टी करताना दिसत आहे. आता या व्हायरल फोटोमागचं सत्य जाणून घ्या.


मलायकाची फ्रेंड्ससोबत पार्टी?


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मलायकाच्या फोटोमध्ये ती तिच्या मैत्रिणींसोबत मस्ती करताना दिसत आहे. या फोटोमध्ये मलायका अरोरासोबत ची बहीण अमृता अरोरा (Amrita Arora), करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan), नताशा पूनावाला (Natasha Poonawala), करिश्मा कपूर (Karisma Kapoor दिसत आहे. ही पार्टी करिनाने आयोजित केल्याचा दावा केला जात आहे. उमेर संधू नावाच्या युजरने हा फोटो एक्स मीडियावर पोस्ट केला आहे आणि लिहिलं आहे की, 'वडिलांच्या मृत्यूनंतर फक्त 5 दिवस, मलायका अरोरा आणि तिची बहीण गर्ल्स लंचची मजा घेत होती' त्यांना लाज वाटत नाही का, करीनाने ही पार्टी आयोजित केली होती, असा दावाही या युजरने केला आहे.


फोटोमागचं सत्य काय?


दरम्यान, मलायका अरोराच्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये काहीही तथ्य नाही. हा फोटो जुना असून तो आता चुकीच्या दाव्यांनी व्हायरल करण्यात येत आहे. हा फोटो 2021 मधील असल्याचं सांगितलं जात आहे. अभिनेत्री मलायकाने तिच्या मैत्रिणींसोबत बहीण अमृता अरोरा हिचा वाढदिवस साजरा केला होता, हा फोटो तेव्हाचा असल्याचं सांगितलं जात आहे. 


मलायकाच्या वडिलांनी आत्महत्या करण्याचं कारण काय?


मलायकाच्या वडिलांनी आत्महत्या का केली याबाबत अद्याप कोणतीही बातमी समोर आलेली नाही. मात्र, पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, मलायकाच्या वडिलांच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा होत्या, त्यामुळे त्यांना प्राण गमवावे लागले. अनिल मेहता यांनी बाल्कनीतून उडी मारल्यामुळे या जखमा झाल्या की त्यामागे आणखी काही कारण आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत असून सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Squid Game Season 2 Trailer : Are You Ready? स्क्विड गेम 2 चा ट्रेलर रिलीज, या दिवशी सुरु होणार मृत्यूचा खेळ