Kanguva Movie Release Date : सुपरस्टार अभिनेता सूर्या, बॉबी देओल आणि दिशा पटानी यांचा बहुप्रतिक्षित कंगुवा चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. लेखक-दिग्दर्शक शिव यांचा कंगुवा चित्रपट 10 ऑक्टोबरला प्रदर्शित होणारा होता. मात्र, आता हा फँटसी-ॲक्शन चित्रपट आता 14 नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी या रिलीज डेट पुढे ढकलल्याची माहिती दिली आहे.
'कंगुवा' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली
कंगुवा चित्रपटाचं (Kanguva Movie) पोस्टर रिलीज झाल्यापासून चाहत्यांचं याकडे लक्ष वेधलं आहे यानंतर कंगुवा चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज झाल्याापासून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेले दृश्य, कलाकारांचा वास्तववादी अभिनय आणि मंत्रमुग्ध करणारे संगीत यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. ट्रेलरवरुनच 'कंगुवा' चित्रपट हिट होणार असल्याचं बोललं जात आहे. दिग्दर्शक शिव दिग्दर्शित 'कंगुवा' हा या वर्षातील सर्वात मोठा आणि महागडा चित्रपट मानला जात आहे.
कंगुवाला नवीन रिलीजची डेट
कंगुवा चित्रपट आधी 10 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. पण, आता या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. चित्रपटाचे निर्माते स्टुडिओ ग्रीनने एक्स मीडियावर चित्रपटाच्या नवीन रिलीज डेटची घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये स्टुडिओ ग्रीनने लिहिलंय, "द बॅटल ऑफ प्राइड अँड ग्लोरी, फॉर द वर्ल्ड टू विटनेस. 14 नोव्हेंबरपासून कंगुवा चित्रपटगृहात आहे. #KanguvaFromNov14." 10 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर रजनीकांत-स्टारर वेट्टयान (Rajnikanth Upcoming Movie Vettaiyan) या चित्रपट रिलीज होणार आहे. या दिवशी कंगुवा आणि वेट्टयान चित्रपटाची टक्कर टाळण्यासाठी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले.
सूर्यासोबत बॉबी देओल आणि दिशा पटानी महत्त्वाच्या भूमिकेत
कंगुवा चित्रपटाचं बजेट सुमारे 350 कोटींहून अधिक आहे. या यंदाच्या वर्षातील सर्वात महागडा चित्रपट असल्याचं सांगितलं जात आहे या चित्रपटाचं बजेट पुष्पा, सिंघम आणि इतर अनेक बिग बजेट प्रोजेक्टपेक्षा जास्त आहे. हा चित्रपट सात वेगवेगळ्या देशांमध्ये शूट करण्यात आला आहे. या चित्रपटात विशेषत: ॲक्शन आणि सिनेमॅटोग्राफीसाठी हॉलिवूड तज्ज्ञांचाही सहभाग आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :