Malaika Arora : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'डान्सिंग क्वीन' मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनेत्रीचे सिजलिंग व्हिडीओ आणि जिममधील वर्कआऊटचे फोटो (Malaika Arora Photo) सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. वयाच्या 50 व्या वर्षी अभिनेत्री खूपच फिट दिसते. अभिनेत्रीच्या फिटनेस मंत्रासह तिचं सौंदर्य पाहण्यासाठी चाहते वेडे होत असतात. अरहान खानची (Arhan Khan) 'हॉट मॉम' म्हणून ती लोकप्रिय आहे. आपल्या हटके गोष्टींच्या माध्यमातून ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. 


मलायका अरोराने लहान वयात अरबाज खानसोबत लग्न केलं. त्यांना एक मुलगा असून त्याचं नाव अरहान खान आहे. लग्नाच्या 19 वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. आता मलायका अरोरा बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. अर्जुन कपूर हा मलयका अरोरापेक्षा खूपच लहान आहे. मलायकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की योग आणि वर्कआऊट हे मलायकाच्या फिटनेसचं रहस्य आहे. 


मलायका अरोराची शानदार फिगर


बॉलिवूडची नंबर वन आयटम गर्ल मलायका अरोरा लवकरच 50 वर्षांची होणार आहे. अभिनेत्रीच्या ग्लॅमरस अदा पाहून यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. तिचे स्टाइलिश लूक्स चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतात. त्यावरुण अभिनेत्रीच्या वयाचा कोणालाही अंदाज येणार नाही. मलायका व्यायाम करण्यासोबत डाएटदेखील करते. आपल्या हेल्दी डाएटमध्ये प्रोटीनचं प्रमाण ती जास्त ठेवते. 




मलायका अरोराचं डाएट काय? (Malaika Arora Diet) 


- मलायका अरोरा आपल्या दिवसाची सुरुवात गरम पाणी पिऊन करते. या पाण्यात लिंबू आणि मधदेखील असतं. दररोज ती या पाण्याचं सेवन करते. 
- मलायका सकाळच्या नाश्त्यात हल्का-फुल्का आहार करते. यात फळे, पोहे, इडली, मल्टीग्रेन टोस्ट आणि उपमा खाते. 
- फिगरला मेंटेन ठेवण्यासाठी मलायका ज्युस, ब्राऊन ब्रेड आणि अंडी खाते. तसेच नाश्त्यात ती सुखा मेवा आणि आक्रोड खाते. 
- मलायका अरोरा दुपारच्या जेवणात भाकरी, भाजी, भात हे पदार्थ खाते. फिट राहण्यासाठी या डाएट प्लॅनसह ती दररोज योगा आणि व्यायामदेखील करते. 
- मलायकाला कार्डिओ, वेट लिफ्टिंग आणि किक बॉक्सिंग करायला आवडतं. 


बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरासारखं तुम्हालाही जर फिट आणि तरुण दिसायचं असेल तर तुम्हा हा डाएट चार्ट फॉलो करू शकतात. पण कोणत्याही गोष्टीचं सेवन करण्याआधी डॉक्टरांना विचारणं खूप गरजेचं आहे. तुमच्या शरीरासाठी कोणती कोण फिट होईल यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


संबंधित बातम्या


Health : वयाच्या पन्नाशीतही इतकी फिट? यामागे काय गुपित? मलायका अरोरा करते 'हे' 5 व्यायाम, जाणून घ्या.