Rakhi Sawant : 'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) रुग्णालयात अचानकपणे दाखल झाल्याने अनेकांना धक्का बसला. काहींना हा देखील तिचा स्टंट वाटला. तर, काहींनी तिच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. राखीच्या आजारपणाबाबत दोन भिन्न मतप्रवाह दिसत असताना तिच्या दोन्ही एक्स-पतींमध्ये मतभिन्नता दिसून आली आहे. राखी सावंतचा पूर्व पती रितेश सिहंने ती रुग्णालयात दाखल असल्याचे म्हटले. तर, तिचा दुसरा पूर्व-पती आदिलने कारवाईपासून वाचण्यासाठीच राखी सावंत हे नाटक करत असल्याचा दावा केला. त्यामुळे राखीच्या आजारपणावरुन तिचे दोन्ही पूर्व-पती भिडले आहेत.
होय राखी आजारी आहे, रितेशचा दावा
राखी सावंतची तब्येत खरोखरच खराब असल्याची पुष्टी राखी सावंतचा पूर्व-पती रितेश याने केली आहे. मीडियाशी बोलताना त्याने सांगितले की, 'राखीने स्वतःची अशी प्रतिमा तयार केली आहे की लोकांना हे नाटक वाटले आहे.पण, ती गंभीर आजारी आहे. लांडगा आला रे आला सारखी सध्या स्थिती झाली आहे. ती खरोखरच आजारी असूनही लोकांना ही बाब खरी वाटत नाही. तिच्या गर्भाशयात गाठ असल्याचे त्याने म्हटले. राखी लवकर बरी होईल असा विश्वासही त्याने व्यक्त केला.
आदिलने केले राखीवर आरोप....
राखी सावंत दुसरा पूर्व-पती आदिल दुर्रानीने राखी सावंतवर आरोप केले आहेत. व्हिडीओ लीक प्रकरणातील कारवाईपासून वाचण्यासाठी ती नाटकं करत असल्याचे आदिलने म्हटले. राखी सावंतचा कोणताही मेडिकल रिपोर्ट नाही, कोणत्या रुग्णालयात आहे, त्याची माहिती नाही. राखी सावंत फक्त अटकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी ही नाटकं करत असल्याचे आदिलने म्हटले. आदिलनने रितेशचा दावाही खोडून काढला. त्याने म्हटले की, ज्यावेळी राखी सोबत रिलेशनशिपमध्ये होतो, तेव्हा तिची पूर्ण बॉडी-टेस्ट झाली होती. त्यावेळी कोणताही आजार, गाठ आढळून आली नाही.
राखी सावंतचा रुग्णालयात अॅडमिट असल्याचा फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया दिसून आल्या. काहीजण याला राखीची नौटंकी म्हणत होते. तर काहीजण कॅमेरासाठी हे सगळं करत असल्याचं सांगत होते.