एक्स्प्लोर
बाबा रामदेव यांनी पतंजलीचं कंडोम बाजारात आणावं : राखी सावंत
‘हिंमत असेल तर बाबा रामदेव यांनी पतंजलीचं कंडोम बाजारात आणावं’, असं आव्हान नेहमी वादात राहणाऱ्या राखी सावंतनं दिलं आहे.

मुंबई : ‘हिंमत असेल तर बाबा रामदेव यांनी पतंजलीचं कंडोम बाजारात आणावं’, असं आव्हान नेहमी वादात राहणाऱ्या राखी सावंतनं दिलं आहे. लवकरच राखी सावंत एका कंडोमच्या जाहिरातीत झळकणार आहे. राखी सावंतनं यासाठी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओही अपलोड केला आहे. 'बाबा रामदेव तुमच्या हिंमत असेल तर तुम्ही पतंजलीचे कंडोम तयार करा.' असं तिने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
दुसरीकडे केंद्र सरकारनं कंडोमच्या जाहिराती या रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंतच दाखवल्या जाव्यात, असा निर्णय घेतल्यानंतर राखी सावंतनं याबाबतही नाराजी व्यक्त केली होती. ‘माझी जाहिरात येणार असल्यामुळेच केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे.’ असा दावाही राखी सावंतनं केला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भविष्य
महाराष्ट्र
क्राईम




















