Mahima Chaudhary Birthday Special : 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे, महिमा चौधरी. तिचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखो वेडे होते. अभिनेत्री महिमा चौधरीला आज 13 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. नव्वदच्या दशकात महिमा चौधरी अचानक स्टार झाली आणि तिचं नशीब पालटलं. महिमा चौधरीने शाहरुख खानच्या परदेस चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केलं आणि ती रातोरात स्टार झाली.


अभिनेत्री अचानक झाली स्टार


अभिनेत्री महिमा चौधरीचा आज 51 वा वाढदिवस आहे. 90 च्या दशकात अभिनेत्री अचानक स्टार झाली, मात्र नंतर एका अपघाताने तिचे संपूर्ण आयुष्यच बदललं.  बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीने 1997 साली शाहरुख खानच्या 'परदेस' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. महिमाने बॉलीवूडमध्ये फारसे चित्रपट केले नाहीत, पण तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनय कौशल्य आणि सौंदर्याच्या जोरावर महिमाने प्रेक्षकांच्या हृदयात स्वत:ची वेगळी छाप पाडली आहे. बऱ्याच काळानंतर ती आता चित्रपटसृष्टीत पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे.


मॉडेलिंगपासून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास


अभिनेत्री महिमा चौधरीने परदेस चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटामुळे महिमाला प्रसिद्धी मिळाली. चाहत्यांच्या मनावर तिची छाप पाडली गेली. महिमा मॉडेलिंगमधून नंतर चित्रपटांकडे वळली. महिमाचा जन्म 13 सप्टेंबर 1973 रोजी दार्जिलिंगमध्ये झाला. महिमा चौधरीचं खरं नाव रितू चौधरी आहे. मिस दार्जिलिंग ब्युटी पेजंट जिंकल्यानंतर 1990 मध्ये महिमाने शिक्षण सोडून मॉडेलिंगच्या जगात करिअर करण्याचा निर्णय घेतला. 


शाहरुख खानसोबत पहिला चित्रपट


महिमा चौधरी शिक्षण सोडून मॉडेलिंगकडे वळली. तिने ऐश्वर्या रायसोबत अनेक जाहिरातींमध्येही काम केलं. यानंतर त्यांनी एका म्युझिक चॅनलमध्ये व्हीजे म्हणूनही काम केलं. यानंतर सुभाष घई यांच्या चित्रपटात काम करण्याची तिला संधी मिळाली. 1997 मध्ये रिलीज झालेल्या 'परदेस' चित्रपटातून तिने फिल्मी करिअरला सुरुवात केली. 'परदेस'चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. महिमा चौधरीला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. फिल्म इंडस्ट्रीत मोठे यश मिळवल्यानंतर तिच्यासोबत एक अपघात घडला, ज्यामुळे तिचं आयुष्य बदललं. याशिवाय तिने कॅन्सरसारख्या गंभीर आजाराविरुद्धची लढाई जिंकली.






एका अपघाताने आयुष्य बदललं


महिमाचे करिअर चांगलं सुरु असताना तिच्यासोबत मोठा अपघात घडला. 'दिल क्या करे' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान महिमा चौधरीचा अपघात झाला. या अपघातात तिच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या होत्या. शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी महिमाच्या चेहऱ्यावरील काचेचे 67 तुकडे काढले. यामुळे तिचा चेहरा खूप खराब झाला होता, त्यामुळेच ती इंडस्ट्रीपासून दूर गेली. महिमाने 2006 मध्ये बॉबी मुखर्जीसोबत लग्न केलं, पण 2013 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. महिमाला आर्याना नावाची मुलगी आहे. आता ती कंगना रणौतच्या इमर्जन्सी चित्रपटातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bigg Boss Marathi : आर्या अभिनंदन तमाम महाराष्ट्राची इच्छा पूर्ण केलीस, आर्याला शिक्षा करायचीय, तर अरबाजलाही करा; बिग बॉसप्रेमींची मागणी