Mahesh Manjrekar : महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) हे नाव घेतलं तरी मराठी मनोरंजनसृष्टीतील सेलिब्रिटींची दातखिळी बसते. मनोरंजन विश्वात 'महेश मांजरेकर' या नावाचा दरारा आहे. अभिनेते (Actor), दिग्दर्शक (Director), निर्माते (Producer) अशा वेगवेगळ्या भूमिका लिलया पार पाडणाऱ्या महेश मांजरेकरांचा (Mahesh Manjrekar Birthday) आज वाढदिवस आहे. 


16 ऑगस्ट 1989 मध्ये मुंबईत महेश मांजरेकरांचा जन्म झाला. मुंबईत बालपण गेलेल्या महेश मांजरेकरांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण करायचं शालेय वयातच ठरवलं होतं. महेश मांजरेकर आज अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून लोकप्रिय आहेत. 'अफलातून' मराठी नाटकाच्या माध्यमातून महेश मांजरेकर यांनी मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. 


'या' सिनेमामुळे महेश मांजरेकर रातोरात झाले सुपरस्टार!


महेश मांजरेकरांना 'काटे' या सिनेमाने खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली आहे. 'काटे' या सिनेमात त्यांनी राजा बाली यादव यांची भूमिका साकारली होती. या सिनेमातील त्यांच्या कामाचं सर्वांनीच कौतुक केलं. या सिनेमाआधी छोट्या-मोठ्या भूमिकांच्या माध्यमातून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत असे. पण 'काटे' या सिनेमामुळे ते रातोरात सुपरस्टार झाले.


महेश मांजरेकर यांची मनोरंजनसृष्टीत चांगलीच दहशत आहे. 'बिग बॉस'च्या माध्यमातून ते सहभागी कलाकारांची शाळा घेत आले आहेत. महेश मांजरेकरांनी दिग्दर्शक केलेले अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. यात वास्तव, अस्तिस्व, शिक्षणाच्या आयचा घो, लालबाग परळ, काकस्पर्श, कुटुंब अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. सिनेमांसह त्यांनी 'द बेस्ट','ध्यानीमनी','गिधाडे' या नाटकांमध्येही काम केलं आहे.


महेश मांजरेकर गेल्या तीन दशकांपासून हिंदी मराठी मनोरंजनसृष्टी गाजवत आहेत. मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या  महेश मांजरेकरांनी अल्पावधीतच स्वत:ला सिद्ध केलं आहे. अभिनय आणि दिग्दर्शनासह त्यांना गायनाची आवड आहे. अनेक नवोदित कलाकारांना महेश मांजरेकर यांनी संधी दिली आहे. त्यांच्या आगामी 'बटरफ्लाय' (Butterfly) सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. तसेच त्यांची 'एका काळेची मनी' ही सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 






बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या 'अंतिम' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मांजरेकरांना कर्करोगाचे निदान झाले होते. पण आपल्याला झालेल्या आजाराचा परिणाम कामावर होऊन न देता त्यांनी प्रामाणिकपणे शूटिंग पूर्ण केलं. आता ते कर्करोगमुक्त झाले आहेत. त्यांच्या याच संघर्षाने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. 


संबंधित बातम्या


Mahesh Manjrekar : जियो स्टुडिओ निर्मित 'एका काळेचे मणी' वेब सीरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीस; प्रशांत दामले, ऋता दुर्गुळे प्रमुख भूमिकेत