Abhishek Malik : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता अभिषेक मलिक (Abhishek Malik) सध्या चर्चेत आहे. अभिषेक आणि त्याच्या मित्रावर शुक्रवारी जोगेश्वरीमध्ये तीन अज्ञान व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलिक दुपारी विमानतळावरुन मालाडच्या दिशेने आपल्या मित्राला घरी सोडण्यासाठी जात असताना ही घटना घडली आहे.
अभिषेक मलिक आणि त्याचा मित्र 11 ऑगस्टला दुपारी चारच्या सुमारास शंकरवाडी बस स्टॉपजवळ पोहोचला. तेव्हा अभिनेत्याला कॅफेमध्ये एक व्यक्ती हातवारे करताना दिसली. जोरदार वाद झाल्यानंतर तिघांनी मलिकवर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर त्यांनी जोगेश्वरी पोलिसात जाऊन याप्रकरणासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 323, 324 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
अभिषेक आणि त्याचा मित्र 11 ऑगस्टच्या दुपारी शंकरवाडी बस स्टॉपजवळ पोहोचले. त्यावेळी एक व्यक्ती त्यांच्या गाडीच्या समोर आली आणि अभिनेत्याकडे बघत हातवारे करू लागली. त्यानंतर त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून घेण्यासाठी अभिनेत्याची कारची काच खाली केली. दरम्यान काही बोलणं होण्याआधीच त्या अज्ञान व्यक्तीने गाडीवर विनाकारण मारायला सुरुवात केली. त्यानंतर अभिनेता गाडीतून खाली उतरला तेव्हा त्या व्यक्तीसोबत असलेल्या तीन व्यक्तींनी अभिनेत्यावर आणि त्याच्या मित्रावर प्राणघातक हल्ला केला.
प्राणघातक हल्ल्यामुळे अभिषेक मलिकच्या चेहऱ्याला, डोक्याला, हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. प्राणघातक हल्ला झाल्यानंतर अभिनेत्याने आणि त्याच्या मित्राने लगेचच पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या पोलीस हल्लेखोरांचा तपास करत आहेत.
अभिषेक मलिक कोण आहे? (Who Is Abhishek Malik)
अभिषेक मलिक हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. 'कैसी ये यारियां', 'कहाँ हम कहाँ तुम', 'ये हैं मोहब्बतें' अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये अभिषेक मलिकने काम केलं आहे. एक मॉडेल म्हणून त्याने त्याच्या करिअरची सुरुवात केली आहे. नवी दिल्लीत जन्मलेला अभिषेक आज एक उत्कृष्ट अभिनेता आहे. अभिषेकने 2012 मध्ये 'छह-शेह और मात' या मालिकेच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. या मालिकेत तो ऋषी शेखावतच्या भूमिकेत दिसला होता.
संबंधित बातम्या