Mahesh Manjrekar On Eka Kaleche Mani Web Series : महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतात. आता मराठी ओटीटी विश्वात पदार्पण करण्यासाठी ते सज्ज आहेत. 'एका काळेचे मणी' (Eka Kaleche mani) असे या सीरिजचे नाव आहे.


महेश मांजरेकर पहिल्यांदाच वेब शोची निर्मिती करणार


'एका काळेचे मणी' ही कौटुंबिक मराठी वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजची एक झलक नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली असून आता सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. तसेच या सीरिजची निर्मिती मराठी मनोरंजनसृष्टीत एकापेक्षा एक कलाकृतींची निर्मिती केलेले महेश मांजरेकर यांनी केली आहे. 


महेश मांजरेकरांनी खास पोस्ट शेअर करत दिली माहिती (Mahesh Manjrekar Shared Special Post)


महेश मांजरेकरांनी लिहिलं आहे,"आंबड गोड नात्यांची, गोड रुसव्या-फुगव्यांगी आहे ही सुपरकूल कहाणी थोडे लव्हली, थोडे इरसाल, आहेत मात्र सगळे 'एका काळेचे मणी'. साधेभोळे वडील, एक शहाणी आई, भावंडं आणि अतरंगी शेजारी.. खिडकीतून डोकवाल तर कळेल, एका काळेच्या मण्यांची धमाल गोष्ट". 






तगडी स्टारकास्ट असलेली 'एका काळेचे मणी'


'एका काळेचे मणी' ही बहुचर्चित सीरिज प्रेक्षकांना 26 जूनपासून जिओ सिनेमावर पाहता येणार आहे. महेश मांजरेकरांच्या बॅनरअंतर्गत निर्मिती होत असलेल्या या सीरिजमध्ये समीर चौघुले (Samir Choughule), विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar), ऋता दुर्गुळे (Hruta Durgule), वंदना गुप्ते (Vandana Gupte), पौर्णिमा मनोहर आणि प्रशांत दामले (Prashant Damle) मुख्य भूमिकेत आहेत. तगडी स्टारकास्ट असलेल्या या सीरिजची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे. 


'एका काळेचे मणी' ही कौटुंबिक मराठी विनोदी वेबसीरिज आहे. ही सीरिज प्रेक्षकांना पोट धरून हसवणार आहे. मध्यमवर्गीय काळे कुटुंबाची गोष्ट या सीरिजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. भन्नाट विनोदाने नटलेली, जबरदस्त डायलॉग बाजी असलेली ही वेबसिरीज येत्या 26 जून रोजी जिओ सिनेमावर रीलीज होत आहे. या मालिकेचं लेखन ओम भूतकरने केलं असून दिग्दर्शन अतुल केतकरने केलं आहे.


संबंधित बातम्या 


OTT Movies And Series : 'टिकू वेड्स शेरू' ते 'किसी का भाई किसी की जान'; 'या' आठवड्यात प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार मनोरंजनाची मेजवानी