Hrithik Roshan: अभिनेता हृतिक रोशनची (Hrithik Roshan)  (Hrithik Roshan)  गर्लफ्रेंड सबा आझादचा (Saba Azad)  आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त अनेक सेलिब्रिटी हे सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत आहेत. नुकतीच हृतिकनं एक खास पोस्ट शेअर करुन सबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


हृतिकची पोस्ट


हृतिकनं सबासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं,  "आपण सर्वजण अशी जागा शोधत असतो, जिथे तुम्हाला प्रेरणा मिळाल्यासारखे आणि सुरक्षितता वाटेल. चला जीवन उत्साहानं जगूया, साहस करुया! असं आपल्यासोबत ओरडणारं कोणतरी आपल्या आयुष्यात पाहिजे. तिथूनच साहस सुरू होते.   साहजिक त्यामुळे जादू निर्माण होते.हे मी तुझ्याकडून शिकतो सबा. चला साहस करूया.वाढदिवसाच्या शुभेच्छा माय लव्ह." हृतिकच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.






हृतिक आणि सुझान यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी ह्रतिकचा फॅमिली फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये सबा देखील दिसत होती. ह्रतिक रोशनच्या फॅमिलीसोबत संडे लंच करण्यसाठी सबा त्याच्या घरी गेली होती. 






हृतिक रोशननं सुझान खानसोबत 200 मध्ये लग्नगाठ बांधली त्यानंतर 2014 मध्ये हृतिक आणि  सुझान हे विभक्त झाले. गेल्या काही दिवसांपासूनहृतिक हा सबाला डेट करत आहे तर  सध्या सुझान ही अरसलान गोनीला डेट करत आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. 


हृतिक रोशन हा लवकरच फायटर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी 26 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. फायटरमध्ये दीपिका आणि हृतिक दोघेही अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या:


Saba Azad Trolled: 'दारु जास्त झाली का?'; हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझादला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल