Thangalaan Teaser: 'पोन्नियिन सेलवन 2' (Ponniyin Selvan: II) या चित्रपटाच्या यशानंतर आता  दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील  प्रसिद्ध अभिनेता चियान विक्रम (Chiyaan Vikram) हा थंगालान (Thangalaan) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच थंगालान या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरसोबतच थंगालान या चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर करण्यात आली आहे. थंगालान चित्रपटाच्या टीझरमधील चियान विक्रमच्या (Chiyaan Vikram) लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


थंगालान या चित्रपटाच्या टीझरमध्ये विक्रम हा खतरनाक लूकमध्ये दिसत आहे. विक्रम हा टीझरमध्ये विषारी किंग कोब्राचे स्वतःच्या हाताने दोन तुकडे करताना दिसत आहे.  थंगालन हा चित्रपट पुढील वर्षी 26 जानेवारी 20234 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.


'थंगालान' चित्रपटाची स्टार कास्ट


'थंगालान'चित्रपटाची कथा ही भारतातील ब्रिटीश राजवटीत कोलार गोल्ड फील्डच्या सत्य घटनेवर आधारित असणार आहे. या चित्रपटात विक्रमसोबत पार्वती आणि मालविका मोहनन देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय पशुपती, डॅनियल कॅलटागीरोन आणि हरिकृष्णन अंबुदुराई हे कलाकार देखील 'थंगालान' चित्रपटाचा एक भाग आहेत.


पाहा टीझर:



 चियान विक्रमने सोशल मीडियावर  'थंगालान'चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, सोनाचा मुलगा थंगालान अंगावर शहारे आणण्यासाठी येत आहे.' 






चियान विक्रमच्या  ‘पोन्नियिन सेल्वन’ आणि  'पोन्नियिन सेल्वन-2' या दोन्हीही चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.या चित्रपटामध्ये अभिनेत्री  ऐश्वर्या राय बच्चन, आदित्य करिकलन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. आता चियान विक्रमच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


 गेल्या वर्षी विक्रमचा ‘कोब्रा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.  विक्रम हा 3 वर्षांच्या ब्रेकनंतर या चित्रपटातून पुन्हा मोठ्या पडद्यावर परतला.चित्रपटाने पहिल्याच दिवशी केवळ तामिळनाडूमध्ये 12 कोटी रुपयांची कमाई केली होती. आता विक्रमचा 'थंगालान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागेल आहे. चियान विक्रम हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याच्या  अन्नियान या 2005 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.


इतर महत्वाच्या बातम्या:


Vikram : 'ह्रदयविकाराचा झटका? नाही! माझे एडिट केले फोटो व्हायरल झाले'; साऊथ स्टार विक्रमनं अफवांवर दिली रिअॅक्शन