Celebrity Hairstylist :  मुलगा असो किंवा मुलगी हेअर स्टाइल प्रत्येकाच्या लूकला पूर्णपणे बदलू शकतो. अनेकजण वेळोवेळी आपला लूक बदलण्यासाठी वेळोवेळी हेअर स्टाइल बदलतात. त्याशिवाय, सेलिब्रिटी किंवा ट्रेडिंगनुसारदेखील हेअर स्टाइल केले जातात. अनेकजण हेअर ड्रेसर्सकडे जातात आणि आवडीची हेअर स्टाइल करतात.  हेअर स्टाइलिंगची किंमत ही शहर, सलून आणि हेअर स्टाइलिशनुसार हेअर कटिंगचे दर बदलतात. 


अनेकजण हेअर स्टाइलमध्ये सेलिब्रिटींना फॉलो करतात. बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटपटू, खेळाडूंच्या हेअर स्टाइल अनेकजण फॉलो करतात. चाहतेदेखील या हेअर स्टाइल फॉलो करतात. मात्र, हे सेलिब्रेटी कुठे, हेअर कटिंग करतात आणि किती खर्च करतात याची देखील अनेकांना उत्सुकता असते. बहुतांशी क्रिकेटपटू, सेलिब्रिटी हे आलिम हकीम या सेलिब्रिटी हेअर डिझायनरकडून हेअर कटिंग करतात. 


आलिम यांचे सेलिब्रिटी ग्राहक कोण?


आलिम हे बॉलिवूडसह दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील जवळपास सगळ्याच सेलेब्सची हेअर डिझायनिंग करतात. वॉरमध्ये हृतिक रोशन, कबीर सिंहमध्ये शाहिद कपूर, बाहुबलीमध्ये प्रभास, अॅनिमलमध्ये रणवीर आणि बॉबी देओल, जेलरसाठी रजनीकांतची हेअर डिझाइनिंग आलिम यांनी केली. 


त्याशिवाय, अजय देवगण, विराट कोहली, श्रेयस अय्यर, महेंद्र सिंह धोनी, महेश बाबू, रणबीर सिंह, रोहित शर्मा, आनंद पिरामल, अर्जुन कपूर यांच्यासह अनेक सेलेब्स हे आलिमचे यांचे क्लाएंट आहेत. 


वडिलांचा व्यवसाय पुढे चालवला...


28 मार्च 1984 मध्ये आलिम यांचे वडील हकीम कैरानवी यांचे निधन झाले. त्यावेळी आलिम हे 9 वर्षाचे होते. हकीम कैरानवी हे 1960 ते 80 या दरम्यानच्या काळातील सर्वोत्तम हेअरड्रेसर होते. त्यांनी हेअर स्टायलिंगला नवा आयाम देण्यास सुरुवात झाली. 


आलिम यांनी 9 व्या वर्षापासून काम शिकण्यास सुरुवात केली होती.तर  वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी हेअर डिझायनर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. आलिम यांच्या वडिलांनी अमिताभ बच्चन यांची हेअर स्टाइल बनवली होती. दिलीप कुमार ते सुनील दत्त, अनिल कपूर पर्यंतचे विविध सेलेब्स हे त्यांचे ग्राहक होते. त्याशिवाय, ब्रुस ली, मोहम्मद अली, टोनी क्रेग, रिचर्ड हॅरिस, क्रेझी बॉईज आदी कलाकारांची हेअर स्टाइल आलिम यांच्या वडिलांनी केली होती. 


आलिम यांनी मुंबईतील मिठीबाई कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले तेव्हा करिअरमध्ये काय करावे, या विचारात होते. त्यानंतर त्यांनी 16 व्या वर्षीच वडिलांचा हकीम ब्रॅण्डला पुढे नेण्याचा विचार केला. 


हेअरकटसाठी किती रुपये आकारतात?


एका वृत्तानुसार, आलिम यांनी आपल्या घरातील बाल्कनीमध्ये एक साधारण पंखा, बेसिन आणि कटिंग खुर्चीपासून सुरुवात केली होती. आपल्या मेहनतीच्या बळावर त्यांनी यश संपादित केले. आज त्यांचा मोठा हेअर ड्रेसिंग स्टुडिओ आहे.  आलिम हकीम यांनी हेअर स्टाइलिंग आणि हेअरकटसाठी किमान एक लाख रुपये चार्ज करतात. ही किंमत हेअरस्टायलिंगनुसार बदलते.