Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' कसा आहे? वाचा रिव्ह्यू...
Baipan Bhaari Deva : केदार शिंदेच्या (Kedar Shinde) ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) या सिनेमाबद्दल एका शब्दात सांगायचं झालं तर ‘भारी’ एवढंच म्हणता येईल.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Tuzech Mi Geet Gaat Aahe: प्रिया मराठेनं सोडली 'तुझेच मी गीत गात आहे' मालिका
Tuzech Mi Geet Gaat Aahe: तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या छोट्या पडद्यावरील मालिकेमधील विविध ट्वीस्ट येत असतात. या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. पण आता या मालिकेमधील अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) ही आता या मालिकेचा निरोप घेणार आहे. प्रियानं याबाबत एक पोस्ट शेअर करुन चाहत्यांना माहिती दिली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Madhuri Pawar : पत्र्याच्या झोपडीत बालपण गेलेल्या माधुरी पवारच्या स्वप्नातलं घर कसं आहे?
Madhuri Pawar : मराठमोळी अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवारचा (Madhuri Pawar) मोठा चाहतावर्ग आहे. माधुरी आज घराघरांत पोहोचली असली तरी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. आता इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत माधुरीने तिच्या संघर्षाबद्दल भाष्य केलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिका करण्यास अरुंधतीने दिलेला नकार, पतीच्या सल्ल्यामुळे पालटलं नशीब
Madhurani Prabhulkar On Aai Kuthe Kay Karte Marathi Serial : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत मधुराणी प्रभुलकरने (Madhurani Prabhulkar) आईची भूमिका साकारली आहे. या मालिकेच्या माध्यमातून मधुराणी घराघरांत पोहोचली आहे. पण या मालिकेसाठी मधुराणीने नकार दिला होता.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Dada Kondke : दादा कोंडकेंचं खरं नाव काय? जाणून घ्या त्यांचा सिनेप्रवास...
Dada Kondke : अभिनेते, निर्माते दादा कोंडके यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. दादा कोंडके यांचं खरं नाव कृष्णा कोंडके असं आहे. भालजी पेंढाकरांच्या 'तांबडी माती' या सिनेमाच्या माध्यमातून दादा कोंडके यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.दादा कोंडके यांचे सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, राम राम गंगाराम हे सिनेमे चांगलेच गाजले आहेत.