Madhurani Prabhulkar On Aai Kuthe Kay Karte Marathi Serial : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत मधुराणी प्रभुलकरने (Madhurani Prabhulkar) आईची भूमिका साकारली आहे. या मालिकेच्या माध्यमातून मधुराणी घराघरांत पोहोचली आहे. पण या मालिकेसाठी मधुराणीने नकार दिला होता. 


'या' कारणाने मधुराणीने 'आई कुठे काय करते' मालिका करण्यास दिलेला नकार


मधुराणीची लेक लहान असल्याने तिची कोणत्याही बाबतीत गैरसोय होऊ नये म्हणून तिने 'आई कुठे काय करते' ही मालिका करण्यास नकार दिला होता. लेकीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याची मधुराणीची इच्छा होती. त्यामुळे तिने 'आई कुठे काय करते' ही मालिका करण्यास नकार दिला होता. मालिका करण्यास माधुरीने नकार दिल्याचं तिच्या पतीला म्हणजेच प्रमोदला कळल्यानंतर त्याने तिची समजूत घातली आणि लेकीची काळजी नको करू मी घेईल तिची काळजी असं सांगितलं. पतीच्या सांगण्यावरुन माधुरीने नंतर 'आई कुठे काय करते' ही मालिका करण्याचं ठरवलं. 


मधुराणी प्रभुलकरबद्दल जाणून घ्या... (Who Is Madhurani Prabhulkar)


मधुराणी प्रभुलकर एक उत्कृष्ट अभिनेत्री, गायिका आणि संगीतकार आहे. सध्या 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मधुराणीचा जन्म भुसावळमध्ये झाला असला तरी तिने अनेक सिनेमे, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. 


मधुराणी प्रभुलकरला लहानपणीच अभिनयाची आवड लागली. 'सी-सॉ' हे तिने लिहिलेलं पहिलं नाटक आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी तिने लिहिलेल्या या नाटकाला पुरुषोत्तम करंडक मिळाला होता. 2003 मध्ये 'इंद्रधनुष्य' या मालिकेच्या माध्यमातून तिने करिअरची सुरुवात केली. 'गोडगुपित' या सिनेमाची निर्मितीदेखील माधुरीने केली आहे. तसेच 'तुमचं आमचं सेम असतं', 'नवरा माझा नवसाचा' या सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत माधुरी झळकली आहे. 


मधुराणीच्या गाजलेल्या मालिका आणि सिनेमांबद्दल जाणून घ्या.. (Madhurani Prabhulkar Movies And Serials)


मधुराणीने लेकरु, नवरा माझा नवसाचा, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, सुंदर माझे घर, मणी मंगळसूत्र, जिथुन पडल्या गाठी, भाभीपीडिया, आरोहन या सिनेमांत काम केलं आहे. तसेच इंद्रधनुष्य, यंदा कर्तव्य आहे, हिच माझी मैत्रीण, असंभव या मालिकांमध्येही ती महत्त्वाच्या भूमिकेत झळकली आहे. तसेच 'सारेगमप सेलिब्रिटी स्पेशल' या कार्यक्रमातही अरुंधती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. 


संबंधित बातम्या


Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकरचा मोठा निर्णय; संचालक पदाचा दिला राजीनामा