Tuzech Mi Geet Gaat Aahe: तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या छोट्या पडद्यावरील मालिकेमधील विविध ट्वीस्ट येत असतात. या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. पण आता या मालिकेमधील अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) ही आता या मालिकेचा निरोप घेणार आहे. प्रियानं याबाबत एक पोस्ट शेअर करुन चाहत्यांना माहिती दिली आहे. आता तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत मोनिका ही भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल. प्रियाच्या ऐवजी या मालिकेत मोनिका ही भूमिका एक प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री साकारणार आहे. जाणून घेऊयात त्या अभिनेत्रीबद्दल...
तेजस्विनी लोणारी साकारणार मोनिका
तेजस्विनी लोणारी ही मोनिका ही भूमिका साकारणार आहे. तेजस्विनीनं मालिकेती स्वरा उर्फ स्वराजसोबतचा एक व्हिडीओ नुकताच शेअर केला. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं,'खूप आनंद होतोय सांगताना की मी स्टार प्रवाह परिवारची सदस्य झाले आहे. तर पाहायला विसरू नका “तुझेच मी गीत गात आहे. ह्या छोट्या चिमुकली सोबतचा हा गमतीदार व्हिडीओ.' आता मोनिका या भूमिकेत तेजस्विनी लोणारीला पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
प्रियाची पोस्ट
प्रियानं तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते, अचानक तब्येतीची अडचण आल्यामुळे मी ही मालिका सोडत आहे. ' या व्हिडीओला प्रियानं कॅप्शन दिलं, ''मोनिका’ म्हणजे सर्वांची लाडकी अभिनेत्री ‘प्रिया मराठे’ घेत आहे ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेचा निरोप...आजवर तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे प्रियाने ‘मोनिका’ हे पात्र एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं...आम्हाला खात्री आहे आपण सगळेच प्रियाला मोनिका च्या रूपात खूप miss करू...पण भविष्यात लवकरच ती पुन्हा आपल्या भेटीला येईल एका नव्या भूमिकेत''
जाणून घ्या तेजस्विनी लोणारीबद्दल
गुलदस्ता, दोघात तिसरा आता सगळं विसरा,नो प्रोब्लेम या चित्रपटांमध्ये तेजस्विनीनं काम केलं आहे.ती देवमाणूस-2 आणि बिग बॉस मराठी-4 या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. आता लवकरच तिचा अफलातून हा चित्रपट रिलीज होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: