Maharashtra Shahir: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक  केदार शिंदे (Kedar Shinde)  यांचा महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) हा चित्रपट 28 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस आला.  सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अनेक जण या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. या चित्रपटामध्ये अंकुश चौथरीनं शाहीर साबळे यांची भूमिका साकारली असून अभिनेत्री सना   शिंदेनं  शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची भूमिका साकारली आहे.  हा चित्रपट राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  आणि  प्रतिभाताई पवार यांनी  पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर शरद पवार यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. 


अंकुशनं शेअर केली पोस्ट


शरद पवार (Sharad Pawar)  आणि  प्रतिभाताई पवार यांनी महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट पाहिल्यानंतर  या चित्रपटाच्या टीमचे कौतुक केले. शरद पवार  आणि  प्रतिभाताई यांच्यासोबतचा एक व्हिडीओ शेअर करुन अंकुश चौधरीनं लिहिलं, 'मा. शरद पवार आणि प्रतिभाताई यांनी महाराष्ट्र शाहीर चित्रपट पाहून संपूर्ण टीमचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या! ते म्हणाले, 'शेवटचं गाणं सुरु झालं आणि मी अंकुशला पूर्णतः विसरून गेलो.  मला फक्त शाहीर साबळे दिसले..धन्यवाद साहेब!'






महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक नेटकरी महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचा रिव्ह्यू  सोशल मीडियावर  शेअर करत आहेत.अंकुशनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ  शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये थिएटरमधील प्रेक्षक हे चित्रपट पाहिल्यानंतर कलाकारांचे कौतुक करताना दिसत आहे.






महाराष्ट्र शाहीर  या चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे यांनी केली. या चित्रपटात अंकुशसोबतच अतुल काळे, अमित डोलावत, सना केदार शिंदे  यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.बहरला हा मधुमास ,गाऊ नको किसना या महाराष्ट्र शाहीर चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra Shahir: 'माझा पहिला चित्रपट...'; महाराष्ट्र शाहीर चित्रपटातील अभिनेत्री सना शिंदेची खास पोस्ट