Dr. Amol Kolhe Injured Shivputra Sambhaji : डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या 'शिवपुत्र संभाजी' (Shivputra Sambhaji) या महानाट्याचे महाराष्ट्रभर प्रयोग होत आहेत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात या नाटकाचे प्रयोग होत आहेत. या नाटकाच्या एका प्रयोगादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. प्रयोगादरम्यान डॉ. अमोल कोल्हे यांना दुखापत झाली आहे. 


'शिवपुत्र संभाजी' महानाट्यादरम्यान नेमकं काय घडलं? 


'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात प्रयोग होत आहेत. रविवारी (30 एप्रिल 2023) रात्री कराडमधील कल्याणी मैदानावर 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचा प्रयोग सुरू होता. दरम्यान घोड्यावरुन एन्ट्री घेत असताना घोड्याचा मागचा पाय अचानक दुमडला आणि त्यामुळे पाठीला जर्क बसून त्यांच्या मणक्याला दुखापत झाली. 






पाठीत कळ आल्यामुळे डॉ. अमोल कोल्हे यांना लगेचच घोड्यावरुण खाली उतरवण्यात आले. पण तरीही औषधे घेत शो मस्ट गो ऑन म्हणत त्यांनी पुढचा प्रयोग सादर केला. पण आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. 


पुढील प्रयोग रद्द, पण...


28 एप्रिलपासून कराडमधील कल्याणी मैदानावर 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचे प्रयोग सुरू आहेत. पण आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत दुखापत झाली असली तरीही डॉ. अमोल कोल्हे आजचा प्रयोग करणार आहेत. आजच्या प्रयोगानंतर मुंबईला जाऊन ते उपचार घेणार आहेत. त्यानंतर पिंपरी चिंचवड येथील एच. ए. मैदानावर 11 ते 16 मे दरम्यान होणारे पुढील प्रयोग ठरल्याप्रमाणे होणार आहेत. 


'शिवपुत्र संभाजी' हे महानाट्य अप्लावधीतच लोकप्रिय झालं आहे. हे नाटक पाहण्यासाठी चाहते आणि शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. डॉ. अमोल कोल्हेंनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत अपघात झाल्याची माहिती दिली आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.


अमोल कोल्हेंनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका असो किंवा संभाजी महाराजांची भूमिका, त्यांच्या सर्वच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. 'राजा शिवछत्रपती', 'स्वराज्यरक्षक संभाजी', 'स्वराज्यजननी जिजामाता' या ऐतिहासिक मालिकांमध्ये डॉ. अमोल कोल्हेंनी काम केलं आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचा 'शिवप्रताप गरुडझेप' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 


संबंधित बातम्या


Amol Kolhe : अमोल कोल्हेंनी दिलेला शब्द पाळला, अखेर शर्यतीत घोडीवर झाले 'स्वार'


पाहा व्हिडीओ