Maharashtra Din 2023 : राज्यभरात 1 मे हा दिवस 'महाराष्ट्र दिन' (Maharashtra Din 2023) म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. याचनिमित्तनं जाणून घेऊयात महाराष्ट्रातील  प्रसिद्ध संगीतकारांबद्दल...


सुधीर फडके



रामचंद्र विनायक फडके उर्फ सुधीर फडके हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार होते. सुधीर फडके यांनी जवळपास 50 वर्षे मराठी चित्रपसृष्टीवर राज्य केलं.अशी पाखरे येती, विठ्ठला तू वेडा कुंभार यांसारखी गीते देखील त्यांनी गायली. सुधीर फडके संगीतक्षेत्रात बाबूजी या नावानं ओळखले जात होते. त्यांनी  जवळपास 111 चित्रपटांना संगीत दिले.



राम कदम



राम कदम हे महाराष्ट्रातील संगीतकार प्रसिद्ध संगीतकार होते. पिंजरा,दोन बायका फजिती ऐका,चंदनाची चोळी अंग अंग जाळी या  यासारख्या अनेक चित्रपटांसाठी ते संगीत दिग्दर्शक होते.


वसंत देसाई



वसंत देसाई यांनी मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटांचे देखील संगीत दिग्दर्शन केले. तसेच गीता गाती ज्ञानेश्वर,जय जय गौरीशंकर, देह देवाचे मंदिर या नाटकांना देखील त्यांनी संगीत दिले. 


हृदयनाथ मंगेशकर


हृदयनाथ मंगेशकर हे प्रसिद्ध मराठी संगीतकार आहेत. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या,सागरा प्राण तळमळला,वेडांत मराठे वीर दौडले सात या गाण्यांचे त्यांनी संगीतदिग्दर्शन केले. ही गाणी लोकप्रिय ठरली. 



अशोक पत्की



अशोक पत्की हे गीतकार आणि संगीत दिग्दर्शक आहेत. त्यांनी अनेक मराठी-हिंदी चित्रपटांना, जाहिरातींना आणि मालिकांना संगीत दिले आहे. आभाळमाया, अवघाची संसार, या सुखांनो या  या मालिकेंच्या शीर्षकगीतांना अशोक पत्की यांनी संगीत दिलं. ही शीर्षकगीते लोकप्रिय ठरली. 


अजय- अतुल



अजय- अतुल ही मराठी चित्रपटसृष्टीतील  प्रसिद्ध संगीतकार जोडी आहे. मराठी चित्रपटांसोबतच त्यांनी  हिंदी, तेलुगू यांसारख्या चित्रपटांचे देखील संगीत दिग्दर्शन केलं आहे. सावरखेड एक गाव,  जत्रा, जबरदस्त,   साडे माडे तीन, उलाढाल, एक डाव धोबीपछाड, जोगवा आणि नटरंग यांसारख्या मराठी चित्रपटांचे त्यांनी संगीत दिग्दर्शन केलं. तर सिंघम, अग्नीपथ, बोल बच्चन  या हिंदी चित्रपटांचे त्यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.


अवधूत गुप्ते



अवधूत गुप्ते  हा मराठी गायक, संगीतकार, चित्रपटनिर्माता, दिग्दर्शक आहे.  पाऊस या अल्बमामार्फत गायक आणि संगीतकार म्हणून त्याचे पदार्पण झाले.
 


सलील कुलकर्णी 



संगीतकार  सलील कुलकर्णीच्या आयुष्यावर बोलू काही,नामंजूर,दमलेल्या बाबाची कहाणी या अल्बम्सला प्रेक्षकांची विशेष लोकप्रियता मिळाली. त्यानं एक उनाड दिवस,एकदा काय झालं ,हापूस या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केलं.


संबंधित बातम्या


Maharashtra Din 2023 : 'या' दहा कलाकारांनी रसिक मनांवर राज्य केलं; जाणून घ्या महाराष्ट्रातील 'Top 10' कलाकार