Maharashtra Shahir: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक  केदार शिंदे (Kedar Shinde)  यांचा महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) हा चित्रपट 28 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस आला.   या चित्रपटाचं अनेक जण कौतुक करत आहेत. राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  यांनी काही दिवसांपूर्वी हा चित्रपट पाहिला. शरद पवार यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं. अनेक सेलिब्रिटींनी आणि नेत्यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.


जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपट पाहिल्यानंतर दिली प्रतिक्रिया


जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर ट्वीट शेअर करुन "महाराष्ट्र शाहीर" या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, 'कृष्णराव गणपतराव साबळे अर्थात शाहीर साबळे या  महाराष्ट्राच्या लाडक्या आणि लोकप्रिय कलावंतांच्या जीवनावर आधारित "महाराष्ट्र शाहीर" हा चित्रपट आज आदरणीय पवार साहेबांच्या सोबत पाहण्याचा योग आला. मी "महाराष्ट्र शाहीर" या चित्रपटाच्या सर्व टीमच अभिनंदन करू इच्छितो.चित्रपटातील सर्वच कलावंतांनी अफाट मेहनत घेत हा उत्तम चित्रपट साकारला आहे.खासकरून अंकुश चौधरी यांनी अभिनयावर घेतलेली मेहनत प्रभाव पाडून जाते.'






अमृता खानविलकरनं शेअर केली खास पोस्ट



अभिनेत्री अमृता खानविलकरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन "महाराष्ट्र शाहीर" या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. तिनं पोस्टमध्ये लिहिलं,    'प्रेक्षक म्हणून हा चित्रपट बघताना डोळे भरून येतात . अंगावर रोमांच उभे राहतात . उर अभिमानाने भरून येतो... उत्तम दिग्दर्शन .  छायाचित्रण ..  अभिनयाने .. नटलेला हा चित्रपट तुम्ही बघायलाच पाहिजे.'






प्रवीण तरडेनं देखील केलं कौतुक 



अभिनेता प्रवीण तरडेनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं,  'एखादी बायोपिक करणं हेच मुळात शिवधनुष्य असतं आणि त्यात जर ती घरातल्याच माणसावर असेल तर काय घेउ आणि काय नको असं होण्याची जास्तं शक्यता .. पण ती शक्यता टाळून केदार ने शाहीर साबळेंचे आयुष्य काय वेगवान पध्दतीने उलगडलय.. हॅटसअॅाफ मित्रा .  अंकुश चौधरी हा माणुस आणखी किती वर्ष प्रेक्षकांना त्याच्या अभिनयाच्या प्रेमात पाडणार आहे . '



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra Shahir: महाराष्ट्र शाहीर चित्रपट पाहिल्यानंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले, 'शेवटचं गाणं सुरु झालं आणि...'