The Kerala Story : 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून या सिनेमावर टीका होत आहे. या सिनेमावर मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. दरम्यान मुस्लिम युथ लीगने (Muslim Youth league) 'द केरळ स्टोरी' या सिनेमाची कथा खरी असल्याची सिद्ध करणाऱ्याला एक कोटी देणार असल्याची घोषणा केली आहे.


'द केरळ स्टोरी' या सिनेमाचं कथानक काय आहे? (The Kerala Story)


'द केरळ स्टोरी' हा सिनेमा केरळमधील 32000 बेपत्ता मुलींवर आधारित आहे. केरळमधील 32000 मुलींचं धर्मांतर करुन त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास कसं भाग पाडलं जातं हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. पुढे जगभरातील दहशतवादी कारवायायांमध्ये त्यांचा वापर करण्यात आला, असं या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. सुदीप्तो सेन यांनी या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. 


'द केरळ स्टोरी'वर विरोध का होत आहे? 


'द केरळ स्टोरी' हा सत्य घटनेवर आधारित नाही. या सिनेमाची कथा खोटी असल्याचं म्हटलं जात आहे. या सिनेमात चुकीच्या पद्धतीने घटना दाखवण्यात आल्या आहेत. एका विशिष्य समाजाविरोधात द्वेष निर्माण करण्यासाठी या सिनेमाची निर्मिती करण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे. 


मुस्लिम युथ लीगच्या केरळ स्टेट कमिटीने 'द केरळ स्टोरी' या सिनेमाची कथा सत्य असल्याची सिद्ध करण्यासाठी आव्हान दिले आहे. तसेच हे आव्हान सिद्ध करणाऱ्याला एक कोटीचं बक्षीस देण्यात येणार आहे. 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा 5 मे 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान मुस्लिम युथ लीग यांनी दिलेल्या माहितीनुसार,4 मे 2023 रोजी दावे सिद्ध करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात खास संकलन क्रेंद्र उभारले जाणार आहेत. 






मुस्लिम समाज 'द केरळ स्टोरी' या सिनेमाच्या कथेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असताना दुसरीकडे राज्य सरकारदेखील या सिनेमाला विरोध करत आहे. तसेच हा सिनेमा प्रपोगंडा असल्याचंदेखील म्हटलं जात आहे. दुसरीकडे केरळ राज्यातील गंभीर विषयावर भाष्य करणाऱ्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 


संबंधित बातम्या


The Kerala Story : अंगावर शहारे आणणाऱ्या 'द केरळ स्टोरी'चा ट्रेलर आऊट; युट्यूबवर अल्पावधीतच मिळाले 72 लाख व्ह्यूज