Maharashtra Din 2023 : राज्यभरात 1 मे हा दिवस 'महाराष्ट्र दिन' (Maharashtra Din 2023) म्हणून साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांत सिनेसृष्टीत मराठी कलाकारांचं वर्चस्व दिसून आलं आहे.


बालगंधर्व : नारायण श्रीपाद राजहंस बालगंधर्व या नावाने लोकप्रिय होते. अभिनेते असण्यासोबत गायक आणि नाट्यनिर्माते म्हणूनदेखील ते लोकप्रिय होते. हुबेहूब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांना चांगलीच लोकप्रियता मिळाली, ‘धर्मात्मा’ या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. संगीत सौभद्र, संगीत मृच्छकटिक, संगीत शाकुंतल, संगीत मानापमान, संगीत संशयकल्लोळ, संगीत शारदा, संगीत मूकनायक, संगीत स्वयंवर अशी त्यांची अनेक नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत.


डॉ. काशीनाथ घाणेकर : डॉ. काशीनाथ घाणेकर हे 1960 ते 1990 च्या काळातील पहिले सुपर स्टार होते. वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातल्या संभाजींच्या भूमिकेनंतर घाणेकरांना अफाट लोकप्रियता लाभली. दरम्यान मधुचंद्र या सिनेमाच्या माध्यमातून ते सिनेस्टारदेखील झाले.


लक्ष्मीकांत बेर्डे : लक्ष्मीकांत बेर्डे हे मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय नाव आहे. लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी मनोरंजनसृष्टीतील 'हास्यसम्राट' म्हणून ओळखले जातात. त्यांनी 1985 साली सिनेसृष्टीत पदार्पण केलं. लेक चालली सासरला या सिनेमात ते मुख्य भूमिकेत होते. 'धुमधडाका', 'अशी ही बनवाबनवी' आणि 'थरथराट' हे त्यांचे सिनेमे खूपच लोकप्रिय ठरले.


अशोक सराफ : मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारे अशोक सराफ हे सुपरस्टार आहेत. त्यांनी विनोदीच नाही तर गंभीर आणि खलनायकाच्या भूमिकादेखील साकारल्या आहेत. 


दादा कोंडके : दादा कोंडके यांच्या अनेक भूमिका खूपच लोकप्रिय झाल्या आहेत. अभिनयासाह त्यांनी अनेक सिनेमांची निर्मितीदेखील केली आहे. भालजी पेंढारकरांच्या 'तांबडी माती' या सिनेमाच्या माध्यमातून दादा कोंडके यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत. 


महेश कोठारे : महेश कोठारेने 'छोटा जवान' या सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. 'ओह डैम इट' हे त्यांचे पेटंट वाक्य आहे. 'धूमधडाका' हा त्यांनी अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती केलेला पहिला सिनेमा होता.


सचिन पिळगांवकर : सचिन पिळगांवकर अभिनेता, दिग्दर्शक, गायक आणि निर्माता आहेत. 1962 सालच्या 'हा माझा मार्ग एकला' या मराठी सिनेमाद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्याचे सिनेक्षेत्रात पदार्पण झाले.


रमेश देव : रमेश देव यांनी अनेक मराठी व हिंदी सिनेमांत अभिनय केला आहे. त्यांनी त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत 200हून अधिक प्रदर्शनांसह 285हून अधिक हिंदी चित्रपट, 190 मराठी चित्रपट आणि 30 मराठी नाटकांमध्ये काम केले.


विक्रम गोखले : विक्रम गोखले मराठी रंगभूमी, हिंदी चित्रपट आणि दूरदर्शनमधील त्यांच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध होते. गोखले यांनी 2010 मध्ये मराठी सिनेमा 'आघात'द्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले.


नाना पाटेकर : सहनायक, खलनायक आणि चरित्रनायक अशा विविध भूमिका नानांनी केल्या आहेत. नानांचा मराठीत 'नटसम्राट' हा सिनेमा विशेष गाजला आहे. नाना पाटेकर यांनी 'गमन' इ.स. 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. 


संबंधित बातम्या


Maharashtra Din : महाराष्ट्र दिनानिमित्त सरकारी कार्यालयं सजली; मंत्रालय, CSMT, BMCवर अद्भुत रोषणाई