CM Eknath Shindeमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा आज 59 वा वाढदिवस आहे. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसाद ओक (Prasad Oak), मंगेश देसाई (Mangesh Desai) आणि क्षितीज दाते (Kshitij Date) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहे. 


प्रसाद ओकची पोस्ट


प्रसाद ओकनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "मा. मुख्यमंत्री, श्री. एकनाथ जी शिंदे साहेब वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...! ईश्वर आपल्याला निरोगी आणि उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना...!" अशी पोस्ट प्रसाद ओकनं सोशल मीडियावर शेअर केली. 






मंगेश देसाईची पोस्ट


अभिनेता आणि चित्रपट निर्माता मंगेश देसाईनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, 'साहेब तुमच्या विषयी काय लिहू ? किती लिहू!शब्द अपुरे आहेत पण भावना खूप आहेत आणि त्या शब्दात व्यक्त करता येणं शक्यच नाहीत. पण आज एक प्रसंग आठवतो, 2009 साली तुमच्या वाढदिवसाला मी शुभेच्छाचा फोन केला होता आणि एक भावना व्यक्त केली होती की, "तुम्ही मुख्यामंत्री व्हावं' तुम्ही हसला होतात 'आणि हे कसं शक्य आहे मंगेश?'असं म्हणाला होता. पण माझ्या सारख्या अनेक लोकांनी हीच भावना देवाजवळ मनापासून बोलून दाखवली असणार आणि देवाने ती साठवून ठेवली असणार. तुम्ही मुख्यमंत्री झालात ,जनतेचे आवडते झाला आहात. मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा वाढदिवस. या पुढील प्रत्येक वाढदिवस तुमच्या आयुष्यात नवनवीन शक्ती देणारा ठरो हीच देवाकडे प्रार्थना.तब्येतीची काळजी घ्या. कामाबरोबर आराम पण करा आणि शक्तिशाली व्हा!'  






अभिनेता क्षितीज दातेनं देखील एकनाथ शिंदे  यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करुन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 






 


महत्त्वाच्या बातम्या:


PHOTO : देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, ठाण्यातील निवासस्थानी जाऊन भेट