Mahaparinirvan Diwas : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे संगीताची प्रचंड आवड होती. संगितात जात पात धर्म हे भेदभाव नसतात. सात स्वर, 22 श्रुती या निसर्ग निर्मित आहेत. सर्व मानवांना एकत्र बांधणारी ही स्वरांची चेतना आहे. चर्मवाद्य , तंतुवाद्य ,सुषिर वाद्य, घन वाद्य याची मोठी परंपरा संगीत क्षेत्राला आहे. बाबासाहेबांची संगीत क्षेत्राची आवड लक्षात घेवून राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती व तालविहार संगीत संस्थेतर्फे शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे.
राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे सर्वेसर्वा डॉ. हर्षदीप कांबळे या कार्यक्रमाबाबतीत म्हणाले,"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संगीताची आवड होती. त्यामुळे जगातील सर्वोत्तम वादकांकडून बाबासाहेबांना शास्रीय संगीताच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली.
'भीमांजली' या कार्यक्रमाला 2016 साली पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बुद्धम शरणम गच्छामिच्या बासरी वादनाने सुरुवात केली. त्यानंतर आजतागायत जगविख्यात कलाकार बुद्धम शरणम गच्छामि, भीमराया घे तुला या लेकरांची वंदना अशा वाद्यस्वरांनी बाबासाहेबांना वंदन करतात.
पंडित हरिप्रसाद चौरसिया (बासरी), पंडीत भवानी शंकर (पखवाज), पंडीत अतुलकुमार उपाध्ये (व्हायोलिन ), उस्ताद दिलशान खान (सारंगी), उस्ताद शाहिद परवेजखान (सितार) , फ्लूट सिस्टर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुचिस्मिता व डेबूप्रिया चॅटर्जी (बासरी), पंडित प्रभाकर धाकडे(व्हायोलिन), पंडित रोनू मुजुमदार (बासरी) , उस्ताद रफिक खान, शफिक खान (सितार), पंडित संगिता शंकर (व्हायोलिन) पंडीत नॅश नॅबर्ट (बासरी), पंडित तेजस उपाध्ये (व्हायोलिन), उस्ताद उस्मान खान (सितार), पंडित रितेश तागडे (व्हायोलिन), पंडित राकेश चौरसिया (बासरी) तसेच या मंडळींच्या बासरी, वीणा, व्हायोलिन, सतार वादनाला अखंडसाथ देणारे तालविहारसंगित संस्था प्रमुख जगप्रसिद्ध तबला वादक पंडित मुकेश जाधव यात यांचा प्रामुख्याने समावेश असतो.
अनोखी आदरांजली दरवर्षी पहाटे सहा वाजता अर्पण करण्यात येते. राज्यातील वरीष्ठ सनदी अधिकारी, आयपीएस अधिकारी, आयआरएस अधिकारी, सामाजिक संस्था, समाजसेवक, राजकीय पदाधिकारी, माध्यमसमूह, उद्योजक, डॉक्टर, वकिल, महिला व समाजातील सर्वच लहान थोर घटक या वैशिष्टयपूर्ण अभिवादनात सहभाग घेतात.
सकाळी सूर्योदयापूर्वी बाबासाहेबांना शास्रीय संगीतातून आदरांजली वाहणारी ही सतत सात वर्ष चालणारी सांगितिक परंपरा केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळींवरही नोंद घेतली गेलीली बाब आहे.
संबंधित बातम्या