Mahadev Online Gaming App : महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप प्रकरणी (Mahadev Online Gaming App) प्रकरणी आता एक नवी अपडेट समोर आली आहे. 18 सप्टेंबरला UAE मध्ये झालेल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन व सक्सेस पार्टी मध्ये सहभागी झालेल्या कलाकारांची नावे आता समोर आली आहेत. यात संजय दत्त (Sanjay Dutt), सुनील शेट्टी (Suniel Shetty) यांचाही समावेश आहे.


यूएईमध्ये झालेल्या पार्टीत एक युट्यूब इन्फ्लुएंसर सहभागी झाला होता. त्याने आपल्या युट्यूब चॅनलवरुन एक व्हिडीओ शेअर केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि अनेक कलाकार ईडीच्या रडारवर आले. या व्हिडीओमध्ये सौरभ चंद्राकरच्या लग्नापासून ते बर्थडे पार्टी आणि सक्सेस पार्टीची झलक पाहायला मिळत आहेत. तसेच या पार्टीमध्ये सहभागी झालेले कलाकारही दिसत आहेत. 


सौरभ चंद्राकर या आरोपीने आपल्या लग्नासाठी 200 कोटी रुपये तर बर्थडे व सक्सेस पार्टीसाठी 60 करोड रुपये खर्च केल्याचं तपासात समोर येत आहे. 


'हे' बॉलिवूडकर ईडीच्या रडारवर


1.  रफ्तार
2. दीप्ती साधवानी
3. सुनील शेट्टी
4. सोनू सूद
5. संजय दत्त
6. हार्डी संधू
7. सुनील ग्रोव्हर
8. सोनाक्षी सिन्हा
9. रश्मिका मानधना
10. सारा अली खान
11. गुरु रंधावा
12. सुखविंदर सिंग
13. टायगर श्रॉफ
14. कपिल शर्मा
15. नुसरत बरुचा
16. डीजे चेतस
17. मलायका अरोरा
18. नोरा फतेही
19. अमित त्रिवेदी
20. मौनी रॉय
21. आफताब शिवदासानी
22. सोफी चौधरी
23. डेझी शाह
24. उर्वशी रौतेला
25. नर्गिस फाखरी
26. नेहा शर्मा
27. इशिता राज
28. शमिता शेट्टी
29. प्रीती झांगियानी
30. स्नेहा उल्लाल
31. सोनाली सहगल
32. इशिता दत्ता
33. एलनाझ
34. ज्योर्जिओ अॅड्रियानी


महादेव बुक अॅपची जाहिरात आणि प्रमोशन करणाऱ्या या सर्व कलाकार आणि गायकांना मोठी रक्कम देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे सौरभ चंद्राकरच्या लग्नाला हजेरी लावणारे आणि वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झालेले आणि परफॉर्म करणारे सेलिब्रिटीच नाही तर महादेव बुक अॅपची जाहिरात आणि प्रमोशन करणारे बॉलिवूडकर ईडीच्या रडारवर आहेत. 


नेमकं प्रकरण काय? 


महादेव बुक अॅपचा मालक सौरभ चंद्राकरने UAE मध्ये झालेल्या त्याच्या लग्नात 200 कोटी रुपयांचा खर्च केला होता. 200 कोटी रुपये उधळल्यामुळे तो चर्चेत आला. ईडी आता या प्रकरणील मनी लॉन्ड्रींगचा तपास करत असून सौरभच्या लग्नाला UAE मध्ये जे बॉलीवूड जे अभिनेता, अभिनेत्री व गायक उपस्थित होते व त्याचबरोबर काही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांनी महादेव बुक अँपचे प्रचार केले होते त्यांना चौकशीसाठी बोलवणार आहे . 


संबंधित बातम्या


Mahadev Online Gaming App : रणबीर पाठोपाठ कपिल शर्मा आणि अभिनेत्री हुमा कुरेशीला ईडीचं समन्स ; अभिनेत्री हिना खान,श्रद्धा कपूरचंही यादीत नाव