Mahadev Online Gaming App Case Bollywood Celebrity ED Radar : 'महादेव बुक ऑनलाइन गेमिंग अॅप प्रकरण' (Mahadev Online Gaming App) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या कंपनीवर इडीने (ED) छापेमारी टाकली असून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी इडीच्या रडारवर आले आहेत.
अभिनेता रणबीर कपूरनंतर (Ranbir Kapoor) आता प्रसिद्ध बॉलिवूड कलाकार आणि गायक ईडीच्या रडारवर आले आहेत. ज्यांनी महादेव बुक अॅपची जाहिरात केल्याचं तपासात समोर येत आहे. अमिषा पटेल (Ameesha Patel), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor), सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha), इम्रान हाश्मी (Emraan Hashmi), बोमन इराणी (Boman Irani), कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि इतर गायकांसह महादेव अॅपची जाहिरात करणाऱ्या कलाकार आणि गायकांचा व्हिडिओ समोर आला आहे.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव बुक अॅप या ऑनलाइन गेमिंग अॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात या सर्व अभिनेत्यांना आणि गायकांना ईडी अधिकाऱ्यांकडून चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बॉलिवूडकर ईडीच्या रडारवर
महादेव बुक अॅपची जाहिरात आणि प्रमोशन करणाऱ्या या सर्व कलाकार आणि गायकांना मोठी रक्कम देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे सौरभ चंद्राकरच्या लग्नाला हजेरी लावणारे आणि वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झालेले आणि परफॉर्म करणारे सेलिब्रिटीच नाही तर महादेव बुक अॅपची जाहिरात आणि प्रमोशन करणारे बॉलिवूडकर ईडीच्या रडारवर आहेत.
ईडीच्या रडारवर असलेल्या 20 सेलिब्रिटींची नावे...
1. टायगर श्रॉफ (Tiger Shroff)
2. सनी लिओनी (Sunny Leone)
3. आतिफ अस्लम (Atif Aslam)
4. राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan)
5. अली अजगर (Ali Asgar)
6. विशाल ददलानी (Vishal Dadlani)
7. नेहा कक्कड (Neha Kakkar)
8. एली एवराम (Elli Avrram)
9. भारती सिंह (Bharti Singh)
10. भाग्यश्री (Bhagyashree)
11. पुलकित (Pulkit)
12. किर्ती खबंदा (Kriti Kharbanda)
13. नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha)
14. कृष्णाभिषेक (Krushna Abhishek)
15. अमिषा पटेल (Ameesha Patel)
16. श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor)
17. सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha)
18. इम्रान हाश्मी (Emraan Hashmi)
19. बोमन इराणी (Boman Irani)
20. भारती सिंह (Bharti Singh)
ईडीने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बागेल यांचे सल्लागार विनोद वर्मा आणि मुख्यमंत्र्यांच्या दोन ओएसडींची चौकशी केली आहे. बॉलिवूडकरांसह काही स्पोर्ट्स पर्सनॅलिटींनीही या अॅपचं प्रमोशन केलं असल्याचा अंदाज आहे.
संबंधित बातम्या