Marathi Serial Update : छोट्या पडद्यावरील 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या भरपूर चर्चेत आहे. अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहेत. तर, चिमुकली परी अर्थात मायरा वायकूळ देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. ही मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे.
आता नेहाने आपल्या यशवरील प्रेमाची कबुली दिली आहे. यामुळे आता या जोडीच्या आयुष्यात प्रेमाचा बहर येणार आहे. यशच्या रूपाने नेहाच्या आयुष्यात प्रेमाचा वर्षाव होणार आहे. लवकरच प्रेक्षकांना यश-नेहाचा रोमँटिक सीन पाहायला मिळणार आहे. नुकतेच या सीनचे शुटिंग पूर्ण झाले आहे. मात्र, यातही एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
नेहाचं परीकडे दुर्लक्ष!
परी आणि नेहा या दोघी माय-लेकी एकमेकींच संपूर्ण विश्व आहेत. मात्र, आता त्यांच्या या छोट्याशा विश्वात तिसऱ्या व्यक्तीची एण्ट्री झाली आहे. यश देखील आता या कुटुंबाचा एक भाग बनणार आहे. मात्र, यशमध्ये गुंतत चाललेल्या नेहाचं परीकडे काहीसं दुर्लक्ष होताना दिसतंय. यामुळे आता नेहा आपलं प्रेम आणि कर्तव्य अर्थात यश आणि परी यांना एकत्र सांभाळू शकेल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
यशला बाबा म्हणून स्वीकारण्यास परीचा नकार!
यश आता या कुटुंबात सामील होत आहे. मात्र, परी हा बदल स्वीकारण्यास नकार देते. बंडू काका परीला यश तिचा बाबा होणार असल्याचे सांगतात. त्यावेळी परी म्हणते,कोण माझे बाबा? त्यावर बंडूकाका यशच्या दिशेने हात करतात आणि म्हणतात, आता परीने मस्ती केली की मी परीच्या बाबांना येऊन सांगणार. यावर परी म्हणते, हे माझे बाबा नाहीत. हा माझा फ्रेंड आहे. बाबा सोडून निघून जातात. त्यामुळे मला बाबा नकोय म्हणजे नकोय.
परीच्या या उत्तराने नेहा, यश आणि काका-काकू चिंताग्रस्त होतात. नेहा आणि यशच्या या प्रेमकहाणीत परी नवा अडथळा निर्माण करणार की, काय असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे. त्यामुळे मालिकेत आता नवा ट्विस्ट येणार आहे.
हेही वाचा :
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Lock Upp Contestants Full List : कंगनाच्या लॉकअपमध्ये 'या' स्पर्धकांचा सहभाग
- House Full : चार सिनेमात टक्कर, सिनेमागृहांबाहेर झळकतोय हाऊसफुल्लचा बोर्ड
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha