Mahakumbh Monalisa Viral Video : प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभ सुरु असून तिथे साधूसंतांचा मेळा पाहायला मिळत आहे. 144 वर्षांनी भरलेल्या महाकुंभ मेळ्यात जनसामान्यांपासून, राजकारणी ते सेलिब्रिटी हजेरी लावून शाही स्नान करत आहेत. अनेक दिग्गज राजकारणी आणि प्रसिद्ध सेलिब्रिटींनी इथे हजेरी लावली. मात्र, एक तरुणी अशील आहे, जी महाकुंभात आल्याने रातोरात प्रसिद्ध झाली. महाकुंभात सावळा रंग आणि सोनेरी डोळ्यांची अप्सरा मोनालिसा हिने सर्वांचं लक्ष वेधलं. महाकुंभ मेळ्यात रुद्राक्षांच्या माळा विकणारी मोनालिसा हिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि ती चांगलीच प्रसिद्धीझोतात आली. आता मोनालिसाचानव्या आकर्षक अंदाजातील व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सिनेमाची ऑफर मिळताच मोनालिसाचा तोरा बदलला
महाकुंभात वडिलांच्या मदतीसाठी माळा विकणारी 16 वर्षीय तरुणी मोनालिसा हिने तिच्या सौंदर्याने सर्वांनाच मोहित केलं. सावळा रंग आणि सोनेरी डोळ्यांच्या या तरुणीचे फोटो आणि व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाले. तिचा साधेपणा आणि सुंदरतेने सर्वांनाच थक्क केलं. यामुळे ती पाहता-पाहता इंटरनेट सेन्सेशन बनली. यानंतर तिला ब्रँड आणि चित्रपटांच्या ऑफर येत आहे. मोनालिसाने एक चित्रपट साईन केल्याची माहिती आहे. दरम्यान सिनेमाची ऑफर मिळताच मोनालिसाचा ग्लॅमरस अंदाजातील व्हिडीओ समोर आला आहे.
मोनालिसाच्या ग्लॅमरस अदा
मोनालिसा हिचा एक नवा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये नेहमी सालस दिसणारी मोनालिसा फारच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती निळ्या-जांभळ्या रंगाची साडी आणि बॉडीकॉन व्हाईट टॉप परिधान केल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती एकापेक्षा एका पोज देताना दिसत आहे. हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला असून मोठ्या प्रमाणात शेअरही केला जात आहे.
मोनालिसाचा व्हिडीओ चर्चेत
दरम्यान, हा व्हिडीओ AI जनरेटेड व्हिडीओ आहे. मोनालिसाच्या एका फॅन पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मोनालिसाचे डोळे काळ्या रंगाचे दिसत आहेत, मात्र मोनालिसाचे डोळे सोनेरी रंगाचे आहेत. यावरुन हा व्हिडीओ बनावट असल्याचं दिसत आहे. पण, हा व्हिडीओ इतक्या कुशलतेने बनवण्यात आला आहे की, अनेकांना ही मोनालिसा असल्याचं वाटत आहेत. मात्र, काहींनी यावर नकारात्मक प्रतिक्रिया देत हा तंत्रज्ञानाचा गैरवापर असल्याचं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :