South Movie Malayalam Film : रोशन अँड्र्यूज (Rosshan Andrrews) दिग्दर्शित 'मुंबई पोलीस' (Mumbai Police) हा चित्रपट आजकाल पुन्हा एकदा चर्चेत आहे. हा चित्रपट 2013 मध्ये मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला होता आणि अलीकडेच त्याचा बॉलिवूडमध्ये हिंदी रिमेक करण्यात आला. शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) 'देवा' (Deva Movie) हा चित्रपट मल्याळम (Malayalam Movie) भाषेतील 'मुंबई पोलीस' चित्रपटाचा रिमेक आहे. त्यामुळे 'मुंबई पोलिस'ची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

कमी बजेटचा हा चित्रपट (6 कोटी) बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करण्यात यशस्वी झाला. दरम्यान, हा एक अंडररेटेड फिल्म आहे, म्हणजेच, खूप कमी लोकांना याबद्दल माहिती आहे. आता हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम केली जाणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रोशन अँड्र्यूज यांनी केलं होतं आणि कथा बॉबी आणि संजय यांनी लिहिली होती.

डोकं चक्रावून सोडणारी सायकोलॉजिकल थ्रिलर

'मुंबई पोलीस' हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. हे कोची शहरातील एसीपी अँटनी मोझेस (पृथ्वीराज सुकुमारन यांनी साकारलेले) यांच्याभोवती फिरते, ज्यांना त्यांच्या स्वभावामुळे 'रास्कल मोझेस' असं टोपणनाव दिलं जातं. चित्रपटात एक मोठा ट्विस्ट येतो, जेव्हा तो एका अपघातानंतर त्याची स्मृती गमावतो.

फिल्मची स्टारकास्ट... 

फिल्ममध्ये मुख्य भूमिकेत पृथ्वीराज सुकुमारन आहे, ज्यांनी एंटनी मोसेसची भूमिका साकारली. याव्यतिरिक्त जयसूर्या आणि रहमानही मुख्य भूमिकेत आहेत. याव्यतिरिक्त कुंजन, अपर्णा नायर, दीपा विजयन, हिमा डेविस, कॅप्टन राजू, हरीश उथमन यांसारख्या अनेक कलाकारांनी फिल्म शानदार करण्यासाठी योगदान दिलं आहे. 

'देवा'चा बॉक्स ऑफिसवरची पहिल्या दिवसाची कमाई 

शाहिद कपूर आणि पूजा हेगडे 'देवा'च्या रिलीजपूर्वी फिल्मनं 72,660 तिकीट्स विकून जवळपास 1.67 कोटींचं कलेक्शन केलं होतं. दरम्यान, फिल्मचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केवळ 5.5 कोटी होतं. हे आकडे वेळेनुसार बदलू शकतात, खासकरुन विकेंडच्या दिवशी. 

दरम्यान, 'मुंबई पोलीस' आणि त्याचा हिंदी रिमेक 'देवा' बद्दलची ही संपूर्ण अपडेट. तुम्ही आता हा चित्रपट OTT वर पाहू शकता आणि जर तुम्ही तो आधीच पाहिला नसेल तर, नक्की पाहा. 

देवाचा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?