Madhuri Dixit: बॉलिवूडची धकधक गर्ल अशी ओळख असणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. माधुरीचे युट्यूब चॅनल देखील आहे. तसेच माधुरीचे पती डॉक्टर श्रीराम नेने (Shriram Nene) यांचे देखील युट्यूब चॅनल आहे.  माधुरी आणि श्रीराम नेने हे त्यांच्या युट्यूब चॅनलवर विविध व्हिडीओ शेअर करत असतात. नुकताच माधुरीनं एक खास व्हिडीओ तिच्या युट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती श्रीराम नेने यांच्यासोबत मिसळ बनवताना दिसत आहे.


माधुरी दीक्षितनं (Madhuri Dixit) तिच्या युट्यूब चॅनलवर मिसळच्या रेसिपीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, माधुरी आणि श्रीराम नेने यांनी दोघांनी मिळून झणझणीत मिसळ तयार केली आहे. माधुरीनं इन्स्टाग्रामवर या व्हिडीओची माहिती नेटकऱ्यांना दिली आहे. तिनं इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिलं, 'चला मिसळ पाव बनवूया, माझ्या युट्यूब चॅनलवर संपूर्ण रेसिपी पाहा.' माधुरीनं युट्यूबवर शेअर केलेल्या या मिसळच्या रेसिपीचा व्हिडीओला आतापर्यंत 25,430 व्ह्यूज मिळाले आहेत. 






माधुरी आणि डॉक्टर श्रीराम नेने यांनी विविध रेसिपींचे व्हिडीओ युट्यूबवर शेअर केले आहेत. मोदक, कांदे पोहे या पदार्थांच्या रेसिपींचे व्हिडीओ देखील त्यांनी काही दिवसांपूर्वी युट्यूबवर शेअर केले होते. माधुरीच्या युट्यूब चॅनलला 1.27 मिलियन subscribers आहेत. तर माधुरीच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटला  35.4 मिलियन फॉलोवर्स आहेत. डॉक्टर श्रीराम नेने यांच्या युट्यूब चॅनलला  245K subscribers आहेत. 


माधुरीचे चित्रपट


माधुरीची द फेम गेम ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.  या सीरिजमध्ये माधुरीसोबत  संजय कपूर, मानव कौल, सुहासिनी मुले, लक्ष्यवीर सरन या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. आता माधुरीच्या आगामी चित्रपटांची चाहता उत्सुकतेने वाट बघत आहेत.  बेटा , खलनायक,  हम आप के है कौन,दिल तो पागल है या माधुरीच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. माधुरी ही तिच्या अभिनयानं आणि नृत्यशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते. माधुरीचा चाहता वर्ग मोठा आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या: 


Madhuri-Karisma Video: माधुरी आणि करिश्मा 'बलम पिचकारी' गाण्यावर थिरकल्या; नेटकरी म्हणाले, 'दिल तो पागल है-2'