Madhuri Dixit Diet Fitness Plan : 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पन्नाशी ओलांडल्यानंतरही ती प्रचंड फिट आहे. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक लहान मोठ्या कुरबुरी सुरू होतात. पण माधुरी आजही डाएट आणि फिटनेसकडे लक्ष देते. त्यामुळे त्याचा तिला फायदा होतो. अनेकांसाठी माधुरी रोल मॉडेल आहे. माधुरीच्या अभिनयाचं, सौंदर्याचं आणि नृत्याचं नेहमीच सर्वत्र कौतुक होत असतं. माधुरी व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळते. स्किन केअर, हेअर केअर आणि डाएटसंदर्भात अपडेट्स ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देते.
माधुरी बालपणापासून करतेय व्यायाम
माधुरी दीक्षितच्या फिटनेसचं रहस्य नृत्य (Dance) आहे. नृत्य हा तिच्या व्यायाम प्रकाराचा भाग आहे. माधुरीला ट्रेडमिलवर चालायला जास्त आवडत नाही. एका वेळेनंतर ट्रेलमिलवर चालायचा तिला कंटाळा येतो. पण नृत्याचा मात्र तिला कधीही कंटाळा येत नाही.
माधुरी दीक्षितचा डाएट प्लॅन (Madhuri Dixit Diet Plan)
माधुरी दीक्षितने एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, 'धकधक गर्ल' दिवसाला 5-6 छोटे-छोटे मील्स घेते. एकावेळी जास्त प्रमाणात खाण्यावर ती भर देत नाही. आपल्या डाएटमध्ये ती ताज्या फळांचा समावेश करते. माधुरी दररोज सकाळी उठल्यावर नारळ पाणी प्यायला आवडतं. पण कधीकधी ती कडक चहा किंवा हर्बल टीचं पिते. पण नारळ पाणी हा तिच्या डाएटचाच भाग आहे. कोल्डड्रिंक, दारू, सिगरेट या गोष्टींपासून ती दूर आहे. आपल्या डाएटमध्ये माधुरी अंडी, आक्रोड, दही, पालक, हिरव्या भाज्यांचा समावेश करते. प्रोटीन, आर्यन आणि शरीराला जीवनसत्व कसे मिळतील याकडे तिचं लक्ष असतं.
माधुरी दीक्षित फिटनेस प्लॅन (Madhiri Dixit Fitness Plan)
माधुरी दीक्षित घरीच व्यायाम करायला पसंती देते. नेहमीच ती कथ्थक आणि व्यायामाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच पतीसोबत योगा करायला तिला आवडतं. माधुरीचा लेक एरिन तबला वाजवतो आणि माधुरी त्यावर डान्स करत असते. शरीराला तंदुरुस्त ठेवणं गरजेचं आहे, असं माधुरीला वाटतं. माधुरी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या फिटनेसकडे लक्ष देत असते. संतुलित आहार आणि व्यायामासोबत माधुरी चांगली झोपदेखील घेते. त्यामुळे तिच्या शरीराला पूर्णपणे आराम मिळतो. माधुरीला मॉर्निंग वॉक आवडतो.
संबंधित बातम्या