Madhuri Dixit : बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आपल्या सौंदर्याने, अभिनयाने आणि नृत्याने माधुरी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. माधुरीची एक वेगळी डान्सिंग स्टाइल आहे. आपल्या अदाकारीने माधुरी नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते. 'धक धक गर्ल'ने बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. तिचं नृत्य, डायलॉग, अभिनय आणि लूक्सचा मोठा चाहतावर्ग आहे. अनेक चित्रपट सुपरहिट झालेली माधुरी काही बाबतीत मात्र सुपरफ्लॉप झाली आहे. नृत्य, संवादफेक, अभिनयात आघाडीवर असणारी माधुरी दीक्षित आऊटफिट्सच्या बाबतीत मात्र फेल ठरली आहे. तिचे अनेक ड्रेस पाहून तुम्ही ते कधी परिधान करायचाही विचार करणार नाही. माधुरीचे ड्रेस पाहून चाहते म्हणतात,"नको गं बाई". 'धक धक गर्ल'चा अवतार बिघडवणारे हे लूक आहेत. 


रेडिटवर बॉली बिंदास अॅन्ड गॉसिपने माधुरी दीक्षितचे काही चित्रपटांतील आऊटफिटचे फोटो शेअर केले आहेत. माधुरीचे ड्रेस आपल्याला परिधान करायला मिळावे, अशी तिच्या चाहत्यांची इच्छा असते. पण तिचे काही ड्रेस पाहून चाहत्यांची ते ड्रेस परिधान करण्याची कधीही इच्छा होणार नाही. 




माधुरीचे सलग सात चित्रपट झालेले फ्लॉप


माधुरी दीक्षितने 'अबोध' चित्रपटात गौरी नामक पात्र साकारलं होतं. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. त्यानंतर रिलीज झालेले माधुरीचे 'आवारा बाप','स्वाती','हिफाजत','उत्तर दक्षिण' आणि 'खतरों के खिलाडी' हे चित्रपट बॅक टू बॅक बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते. त्यानंतर माधुरी पूर्णपणे खचली होती.


माधुरीचा 'तेजाब' हा चित्रपट 1988 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट यशस्वी झाला. चित्रपटातील 'एक दो तीन' हे गाणंदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. त्याचवर्षी माधुरीचा 'दयावान' हा चित्रपट रिलीज झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटातील 'आज फिर तुमपे प्यार आया' या गाण्यातील माधुरी आणि विनोद खन्ना यांच्या इंटीमेट सीनची चर्चा झाली. 


'या' चित्रपटाने माधुरीला सुपरस्टार केलं


माधुरीला सुभाष घई यांच्या 'राम लखन' या चित्रपटाने सुपरस्टार केलं. या चित्रपटात तिने अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांच्यासोबत काम केलं होतं. माधुरीच्या यशस्वी चित्रपटांमध्ये खलनायक, हम आपके है कौन, दिल, परिंदा, जमाई राजा, साजन, बेटा, दिल तो पागल है, राजा, याराना, अंजाम, पुकार आणि देवदास या चित्रपटांचा समावेश आहे.


संबंधित बातम्या


Khatron Ke Khiladi 14: माधुरीच्या 'डान्स दिवाने'ची जागा घेणार 'खतरों के खिलाडी 14'?, जाणून घ्या कधीपासून सुरु होणार रोहित शेट्टीचा शो