Padma Awards 2024 : देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक एक असणारा 'पद्म पुरस्कार' सोहळा (Padma Awards 2024) आज दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते पार पडला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार प्रदान केले गेले आहेत. द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि भरतनाट्यम नृत्यांगना डॉ. पद्मा सुब्रमण्यम यांना पद्मविभूषण दिला गेला आहे. तसचं  डॉ.बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान करण्यात आला आहे. अभिनेता मिथुन चक्रवर्ती आणि गायिका उषा उथुप यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. याशिवाय समाजसेवक डॉ.सीताराम जिंदाल, हृदयरोगतज्ज्ञ डॉ.तेजस मधुसूदन पटेल आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


राष्ट्रपती भवनात आज 132 लोकांना पद्म पुरस्काराने सन्मानित केलं आहे. 25 जानेवारी 2024 रोजी या पुरस्कारांची घोषणा झाली होती. 'पद्म पुरस्कार' विजेत्यांमध्ये 30 महिलांचा समावेश आहे. 


पद्मविभूषण पुरस्कार


- अभिनेत्री वैजयंतीमाला बाली
-अभिनेता कोनिडेला चिरंजीवी
- प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम
- माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू
- बिंदेश्वर पाठक


पद्मभूषण पुरस्कार


- दिग्दर्शक राजदत्त उर्फ दत्तात्रय अंबादास मायाळू
- ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक
- संगीतकार प्यारेलाल
- हृदयरोग तज्ञ आश्विन मेहता
- जन्मभूमी वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक  कुंदन व्यास
- ज्येष्ठ पत्रकार होर्मुसजी एन कामा


पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांमधे महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा समावेश


पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांमधे महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा समावेश आहे. यात, सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त उर्फ दत्तात्रय अंबादास मायाळू, ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, संगीतकार प्यारेलाल, हृदयरोग तज्ञ आश्विन मेहता, जन्मभूमी वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक,  कुंदन व्यास, जेष्ठ पत्रकार होर्मुसजी एन कामा यांचा समावेश आहे. 


महाराष्ट्रातील 6 जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान


विविध क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील एकूण 6 जणांना  पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी डॉ.मनोहर कृष्णा डोळे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. मनोहर डोळे यांनी गेल्या अनेक  वर्षांपासून नेत्रसेवेमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे.नेत्र तपासणी शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी विनामूल्य नेत्रसेवा देत अमूल्य योगदान दिले आहे. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी झहीर  काझी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मेंदू रोग तज्ञ डॉ.चंद्रशेखर महादेवराव मेश्राम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरॉलॉजीचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. व्यावसायाने बँकर असलेल्या कल्पना मोरपारिया यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल  पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कल्पना यांनी अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर तसेच भारत सरकारच्या अनेक समित्यांवर देखील त्यांनी काम केले आहे.


संबंधित बातम्या


Eknath Shinde : महाराष्ट्राला आपला सार्थ अभिमान आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पद्म पुरस्कारार्थींचे अभिनंदन