Khatron Ke Khiladi 14 Rohit Shetty Show: थरारक, रंजक आणि उत्साही असा कार्यक्रम म्हणजे 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi). या कार्यक्रमात होणाऱ्या स्टंट्समुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतो. तसेच रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) सूत्रसंचालनामुळे या कार्यक्रमाला चार चांद येतात. त्यातच या कार्यक्रमाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडीचा 14वा सिजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. असे म्हटले जात आहे की निर्मात्यांनी आधीच गोष्टी फायनल केल्या आहेत, मग ते स्पर्धक असो किंवा लोकेशन. पण अद्याप याबबात कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. 


दरम्यान रोहित शेट्टीचा हा कार्यक्रम माधुरी दीक्षित आणि सुनील शेट्टीचा डान्स दिवाने रिप्लेस करणार आहे. रिपोर्टनुसार, रोहित शेट्टीचा 'खतरों के खिलाडी 14' हा माधुरी दीक्षित आणि सुनील शेट्टीच्या डान्स दिवानेची जागा घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. असं म्हटलं जात आहे की, भारती सिंगने होस्ट केलेला डान्स रिॲलिटी शो जून महिन्यात संपेल आणि त्यानंतर त्याच टाइम स्लॉटवर खतरों के खिलाडीचे प्रसारण सुरू करण्याचा निर्माते विचार करत आहेत.


शोच्या लॉन्चची तारीख अद्याप जाहीर नाही


या कार्यक्रमाच्या बाबतीत समोर आलेली माहिती ही केवळ शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे.  निर्मात्यांनी खतरों के खिलाडी 14 च्या लॉन्चची तारीख किंवा महिन्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. या कार्यक्रमाबद्दल बोलायचे झाले तर खतरों के खिलाडी 14 मध्ये शोएब इब्राहिम, मनीषा राणी, अभिषेक मल्हान, मोहसिन खान दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


खतरों के खिलाडी हा कायमच प्रेक्षकांच्या आवडीचा रिअॅलिटी शो राहिला आहे. या कार्यक्रमाचा 13 सिजनही विशेष गाजला. त्याचप्रमाणे टीआरपीच्या शर्यतीत देखील कार्यक्रमाने बाजी मारली. खतरों के खिलाडीचे वेगवेगळ्या देशांमध्ये शूट होते. त्यामुळे यंदाच्या सिजनमध्ये कोणत्या देशाची निवड केली जाणार याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. 






ही बातमी वाचा : 


Marathi Actress : आयपीएल सामन्यात मुंबईचा गुजरातकडून पराभव; मराठी अभिनेत्रीची हार्दिक पांड्यासाठी पोस्ट, म्हणाली 'तू अजूनही...'