Amitabh Bachchan And Rajinikanth Movie : मनोरंजनसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रजनीकांत (Rajinikanth) यांची गणना होते. दोघांनीही त्यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासात एका पेक्षा एक सिनेमे दिले आहेत. दोघांचेही चाहते त्यांच्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत असतात. आता 32 वर्षांनी बिग बी अन् थलायवा एकत्र येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
'हम', 'अंधा कानून' आणि 'गिरफ्तार'सारख्या सिनेमांत अमिताभ बच्चन आणि रजनीकांत एकत्र दिसले होते. पण गेल्या तीन दशकांत दोघांनी एकत्र काम केलेलं नाही. आता मीडिया रिपोर्टनुसार, 32 वर्षांनी रजनीकांत आणि अमिताभ बच्चन एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. त्यामुळे आता त्यांच्या जोडीला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन आणि रजनीकांत पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. दोघे 32 वर्षांनी स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. 'जेलर' आणि 'लाल सलाम' या सिनेमाच्या शूटिंगनंतर रजनीकांत टीजे ग्रानवेल दिग्दर्शित 'जय भीम' या सिनेमाचं शूटिंग पूर्ण करणार आहेत.
'थलाइवर 170'च्या शूटिंगला लवकरच होणार सुरुवात
'थलाइवर 170' हा रजनीकांतचा 170 वा सिनेमा आहे. त्यामुळे सिनेमाचं नाव 'थलाइवर 170' ठेवण्यात आलं आहे. 'थलाइवर 170' या सिनेमात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अमिताभ बच्चन आधी 'पोन्नियिन सेल्वन' या सिनेमातील चियान विक्रम यांना या सिनेमासाठी विचारणा झाली होती. पण आता या सिनेमात अमिताभ बच्चन आणि रजनीकांत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. 'थलाइवर 170' या सिनेमाच्या शूटिंगला यावर्षाच्या शेवटी सुरुवात होणार आहे. या सिनेमात टॉलिवूड अभिनेता सूर्याचीदेखील झलक दिसणार आहे. रजनीकांत या सिनेमात पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.
अमिताभ बच्चनचे आगामी प्रोजेक्ट (Amitabh Bachchan Upcoming Project)
अमिताभ बच्चन यांचा आगामी 'प्रोजेक्ट के' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अमिताभ बच्चनसोबत दीपिका पादुकोण आणि प्रभास दिसणार आहे. तसेच टायगर श्रॉफच्या 'गणपत पार्ट 1'मध्येही ते दिसणार आहेत. तसेच रिभू दासगुप्ता दिग्दर्शित 'सेक्शन 84' या सिनेमात ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या ते याच सिनेमाचं शूटिंग करत आहेत. तर दुसरीकडे रजनीकांतचे अनेक सिनेमे सध्या पाईपलाईनमध्ये आहेत.
संबंधित बातम्या