Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) आज पाचवा टप्पा आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी सहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील 49 जागांसाठी मतदान होणार आहे. विशेष म्हणजे, या पाचव्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. बॉलिवूडनगरीतदेखील मतदानाचा (Voting) उत्साह पाहायला मिळत आहे. पण बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना भारतात मतदानाचा हक्क बजावता येत नाही. भारतात काम करुनही या अभिनेत्रींना मतदानाचा हक्क बजावता येत नाही. यात आलिया भट्ट (Alia Bhatt) ते कतरिना कैफपर्यंत (Katrina Kaif) अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे.


आलिया भट्ट (Alia Bhatt) : आलिया भट्ट आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री आहे. पण अभिनेत्रीकडे भारतातील निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार नाही. आलियाकडे भारतीय नागरिकत्व नाही आहे. तर तिच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. आलियाचा जन्म लंडनमधील बर्मिंघममध्ये झाला आहे. या शहरात तिची आई सोनी राजदानचादेखील जन्म झाला आहे. त्यामुळे भारतीय कायद्यानुसार तिला मतदान करता येत नाही.  


कतरिना कैफ (Katrina Kaif) : बॉलिवूडची टॉप अभिनेत्री कतरिना कैफकडे भारतात मतदान करण्याचा अधिकार नाही. कतरिना ब्रिटिश नागरिक असून तिच्याकडे भारताचं नागरिकत्व नाही आहे. कतरिनाचा जन्म ब्रिटिश हांगकांगमध्ये झाला आहे. कतरिनाचे वडील मोहम्मद कैफ हे ब्रिटिश उद्योगपती आहेत. तर आई सुजाना आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी करिअर करुनही कतरिनाला भारतात मतदान करता येत नाही. 


नोरा फतेही (Nora Fatehi) : बॉलिवूडची डान्सिंग क्वीन नोरा फतेहीला भारतात मतदान करण्याचा अधिकार नाही. नोराचं बॅकग्राऊंड मोरक्को आहे. तिचे आई-वडील मोरक्कोमधील आहेत. नोराकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे. 


जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) : जॅकलिन फर्नांडिसचा जन्म बहरीनमध्ये झाला आहे. जॅकलिनचे वडील श्रीलंकेतील असून आई मलेशियाची आहे. त्यामुळे जॅकलिनकडे श्रीलंकेचं नागरिकत्व आहे. राष्ट्रीयत्व नसल्याने जॅकलिनला मतदान करता येत नाही. कारण मतदानाचा अधिकार फक्त भारतीय नागरिकांनाच आहे.


सनी लिओनी (Sunny Leone) : सनी लिओनीचं खरं नाव करनजीत कौर आहे. सनीकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे. त्यामुळे 'लोकसभा निवडणुक 2024'मध्ये मतदान करण्यासाठी ती पात्र नाही. 


शाहरुख खान (Shah Rukh Khan), सलमान खान (Salman Khan), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), अक्षय कुमारसह (Akshay Kumar) अनेक सेलिब्रिटींनी चाहत्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.


संबंधित बातम्या


Shah Rukh Khan : शाहरुख खान, अमिताभ बच्चन, शिल्पा शेट्टी ते आयुष्मान खुराना; बोटाला शाई लागण्याआधी बॉलिवूडकरांचं चाहत्यांना मतदान करण्याचं आवाहन