Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) यंदा लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे. कंगनाला भाजपकडून (BJP) लोकसभेचं तिकीट देण्यात आलंय. त्यामुळे तिची जन्मभूमी असलेल्या हिमाचल प्रदेशातील मंडी या लोकसभा मतदारसंघातून कंगनाला लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. तसेच कंगनाने तिचा अर्ज भरताना प्रतिज्ञापत्र देखील सादर केलं आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार, कंगनाची एकूण संपत्ती ही 90 टक्के रुपये असल्याचं नमूद करण्यात आली आहे.


प्रतिज्ञापत्रानुसार, कंगना राणौतकडे 91.50 कोटी रुपयांची संपत्ती आहे. आलिशान घरे, कार आणि दागिने याशिवाय या अभिनेत्रीकडे बँकेत करोडो रुपये जमा आहेत. कंगनाच्या मुंबईतील वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये अडीच कोटींहून अधिक रुपये आहेत.


8 बँकांमध्ये कोट्यवधी रुपये जमा


कंगना रणौतच्या मुंबईत 7 बँका आणि एक मंडीत अशी एकूण आठ बँकेतील खाती आहे.  ज्यामध्ये एकूण 2 कोटी 55 लाख 86 हजार 468 रुपये जमा आहेत. या अभिनेत्रीचे आयडीबीआय बँकेत दोन खाती आहेत, त्यापैकी एका खात्यात 1,07,10,260,43 रुपये आणि दुसऱ्यामध्ये 22,33,636 रुपये आहेत. कंगनाचे बँक ऑफ बडोदामध्येही खाते असून त्यात 15,189.49 रुपये जमा आहेत.


कंगना राणौतच्या मुंबईतील एचएसबीसी बँकेत 1,08,844.01 रुपये आणि स्टँडर्ड चार्टर्डच्या खात्यात 1,55,504 रुपये आहेत. अभिनेत्रीची आयसीआयसीआय बँकेत दोन खाती आहेत, त्यापैकी एका खात्यात 26,619 रुपये आणि दुसऱ्या खात्यात 50,000 रुपयांच्या ठेवी आहेत. कंगनाचे हिमाचल प्रदेशातील मंडी येथे खाते आहे, जिथून अभिनेत्री निवडणूक लढवणार आहे. कंगना राणौतच्या बँक ऑफ बडोदा खात्यात फक्त 7099 रुपये जमा आहेत.




अभिनेत्रीकडे किती दागिने?


कंगना राणौतकडे हिरे, सोन्या-चांदीचे दागिने देखील आहेत. अभिनेत्रीकडे 3 कोटी रुपयांचे हिऱ्यांचे दागिने, 5 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 50 लाख रुपयांचे चांदीचे दागिने आणि भांडी आहेत.




एका चित्रपटासाठी कंगना किती मानधन घेते


 कंगना रनौत हिमाचल प्रदेशातील मंडीमधून निवडणूक लढवत आहे. कंगना रनौतची एकूण संपत्ती 95 कोटी रुपये आहे. एका चित्रपटासाठी कंगना 15-20 कोटी रुपये आकारते. कंगना रनौत बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. कंगनाला बॉलिवूडची 'पंगाक्वीन' असेही म्हटले जाते. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये कंगनाने काम केलं आहे. आता अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे.                      


ही बातमी वाचा : 


Faizan Ansari : 'हा सगळा पब्लिसिटी स्टंट, ह्यांना बायकोट केलं पाहिजे', गुरुचरण बेपत्ता प्रकरणावर अभिनेत्याची प्रतिक्रिया, पूनम पांडेच्या स्टंटसोबतही तुलना