मुंबई : कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊमुळे लोक आपापल्या घरांमध्ये बंद आहेत. लॉकडाऊन दरम्यान, सलमान खानने 'प्यार करोना' हे आपलं गाणं रिलीज केलं होतं. त्याच्या चाहत्यांनी हे गाण डोक्यावर घेतलं होतं. अशातच आता सलमान खान आपल्या चाहत्यांसाठी आणखी एक गाणं घेऊन आला आहे. आता सलमान खानने त्याचं नवं कोरं गाणं 'तेरे बिना' लॉन्च केलं आहे. या म्युझिक व्हिडीओमध्ये सलमानसोबत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आहे. या म्युझिक व्हिडीओबाबत खास गोष्ट म्हणजे, हे संपूर्ण गाणं सलमान खानने आपल्या पनवेलमधील फार्म हाऊसवर शूट केलं आहे.
लॉकडाऊनमुळे जॅकलीन, वलूशा डीसूजा आणि आयुष शर्मा लॉकडाऊनमुळे सलमान खानच्या पनवेलमध्ये असलेल्या फार्महाउसमध्ये थांबले आहेत. व्हिडीओ पाहताना हा व्हिडीओ फक्त एकाच ठिकाणी शूट केला आहे, यावर विश्वासच बसत नाही. डोंगर, रस्ते आणि तलाव यांमुळे या गाण्यातील लोकेशन्स तुम्हाला आपल्या प्रेमात पाडतात. गाण्यामध्ये सलमान खान आणि जॅकलीन फर्नांडिस या दोघांमधील रोमॅन्टिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
पाहा सलमान खानचं नवं गाणं :
नवं गाणं 'तेरे बिना' संदर्भात सलमान खानने वलुशाला लॉकडाऊन इंटव्ह्यू दिला. हा इंटरव्ह्यू जवळपास साडेचार मिनिटांचा आहे. हा व्हिडीओ सलमान खानने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. सलमान खान या इंटरव्ह्यूमध्ये बोलताना म्हणाला की, 'एक गाणं कधीपासून माझ्या मनात होतं, त्यानंतर मी विचार केला की, हे गाणं या वेळात लॉन्च करूनच टाकू. चांगली कंपनी आहेच.' गाण्याबाबत बोलताना सलमान खान इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला की, 'आम्हाल शुटिंग करण्यासाठी जवळपास 4 दिवस लागले, तरिही आम्ही आतापर्यंत या प्रॉपर्टीचा जास्त वापर केला नाही. गाण्यासाठी मला हे प्रेझेंट करण्याची गरज नाही.' हे गाणं स्वतः सलमान खानने गायलं आहे.
दरम्यान, लॉकडाऊनमुळे बॉलिवूडचा दबंग सलमान खान जवळपास आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत पनवेल येथील त्याच्या फार्महाउसमध्ये अडकला आहे. सलमान खानच्या पनवेलमधील त्याच फार्म हाऊसमधून काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सलमान आपल्या कुटुंबियांसोबत एकत्र येऊन एका स्टोअर रूममधून राशन आणि खाण्या-पिण्याचं काही अत्यावश्यक सामान जवळच उभ्या असणाऱ्या एका बैलगाडीमध्ये ठेवण्यासाठी मदत करत आहे. सलमान खान पुन्हा एकदा गरजूंच्या मदतीसाठी धावून आला असून सलमान ज्या फार्महाउसमध्ये राहत आहे. तेथील आसपासच्या गावांमध्ये राहणाऱ्या गरजू लोकांना राशन देऊन सलमानने मदत केली होती.
संबंधित बातम्या :
Lockdown | गरजूंच्या मदतीसाठी पुन्हा सरसावला सलमान खान, उलिया वंतूर आणि जॅकलीन फर्नांडीस यांचाही सहभाग
'तरडेचा वावर अन् 'राधे'ला पावर!', सलमानसोबत स्क्रिनवर झळकणार प्रवीण तरडे
coronavirus | कोरोनाच्या जनजागृतीसाठी सलमानचे 'प्यार करोना' गाणे रिलीज